उन्हाळ्यात मेकअप करताना 'या' 3 गोष्टींची घ्या काळजी; अन्यथा पडेल महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 01:52 PM2019-04-12T13:52:54+5:302019-04-12T13:53:38+5:30
उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं रक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
(Image Credit : www.karinabrush.com)
उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचं रक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. अन्यथा त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं जेवढं आवश्यक असतं. तेवढीच काळजी मेकअप करतानाही घेणं आवश्यक असतं. उन्हाळ्यामध्ये स्किन इन्फेक्शन व्यतिरिक्त इतरही त्वचेचे आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्वचेचं आजारांपासून रक्षण करण्यासाठी मेकअप करताना अनेक गोष्टीं लक्षात घेणं आवश्यक असतं. आज आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांबाबत काळजी घेणं आवश्यक असतं. जाणून घेऊयात अशा काही गोष्टींबाबत ज्याबाबत काळजी घेणं गरजेचं असतं.
एक्सपायरी डेटनंतर प्रोडक्ट वापरू नका
सर्वच ब्युटी प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेट असते. ही तारिख निघून गेल्यानंतर शक्यतो मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करणं टाळावं. अन्यथा त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जुन्या आणि एक्सपायर्ड मेकअप प्रोडक्ट्समधील बॅक्टेरिया आणि विषारी तत्व त्वचेचं आरोग्य बिघडवतात. कॉस्मॅटिक स्टोअर करून ठेवल्याने अॅलर्जी, स्किन इन्फेक्शन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मेकअप ब्रश एकमेकांसोबत शेअर करू नका
मेकअप ब्रश एकमेकांसोबत शेअर करणं टाळा. मेकअप ब्रश शेयर केल्याने त्वचेला इन्फेक्शन, फंगस आणि इतर बॅक्टेरियाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत मेकअप ब्रश शेअर करत असाल तर त्यामुळे बॅक्टरिया आणि इतर घातक तत्व ब्रश मार्फत तुमच्या त्वचेवर येतात. सर्व मेकअप प्रोडक्ट्स एयरटाइट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवा. बाथरूम किंवा ड्रेसिंग टेबलवर उघड्यावर ठेवू नका. यामुळे कॉस्मेटिक्स, ब्रश यांवर वातावरणातील घातक तत्व अगदी सहज चिकटतात. त्यामुळे त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
मेकअप बॅलेन्स असणं गरजेचं
मेकअप करताना एक बेसिक रूल नेहमी लक्षात ठेवा. तुमचा मेकअप नेहमी तुमच्या फेसला बॅलेन्स करणारा असावा. उदाहरणार्थ, डोळे आणि ओठांमध्ये कोणतीतरी एकच गोष्ट हायलाइट करा त्यामुळे फेस बॅलेन्स होण्यास मदत होते. जर तुम्ही स्मोकी किंवा लाउड मेकअप करत असाल तर लिपस्टिक शेड लाइट ठेवा. तेच जर लिपस्टिक कलर्स फार ब्राइट आणि लाउड असतील. तर आय मेकअप मिनिमम असणं गरजेचं आहे. ज्या महिला असं करत नाहीत. त्यांचा मेकअप आणि चेहरा पाहण्यासाठी फार विचित्र वाटतं.
टिप : वरील सर्व उपाय केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.