मेकअप करताना हे टाळाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2016 05:30 PM2016-12-07T17:30:55+5:302016-12-07T17:30:55+5:30
आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने विकत घेऊन मेकअपही करतात. मात्र बऱ्याचदा या प्रसाधनांचा नेमका वापर कसा करायचा याची माहिती सर्वच महिलांना नसल्याने ही प्रसाधने वाया जातात किंवा केलेला मेकअप फारसा चांगला वाटत नाही.
Next
आ प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने विकत घेऊन मेकअपही करतात. मात्र बऱ्याचदा या प्रसाधनांचा नेमका वापर कसा करायचा याची माहिती सर्वच महिलांना नसल्याने ही प्रसाधने वाया जातात किंवा केलेला मेकअप फारसा चांगला वाटत नाही. मुळात मेकअप करतेवेळी सौंदर्यप्रसाधनांचा योग्य वापर करण्याच्या काही पद्धती असतात. यावरुनच तुमचे सौंदर्य खुलते. यामुळे मेकअप करताना पुढील टिप्स अवश्य फॉलो करा...
* आपण सौंदर्य खुलविण्यासाठी चेहऱ्याला पावडर लावतो, मात्र बऱ्याचदा ते चुकीच्या पद्धतीनेच लावले जाते. यामुळे ओठांच्या व डोळयांच्या भोवताली ही पावडर त्वचेच्या मूळ रंगाशी विसंगत दिसते. याऐवजी जर ब्रशरच्या मदतीने ट्रान्सक्युलंट पावडर लावली तर मात्र चेहऱ्याचा रंग एकसमान दिसण्यास मदत होते.
* चेहऱ्याला चकाकी येण्यासाठी आपण बऱ्याचदा शिमर्स किंवा ब्लश चेहऱ्यावर लावतो. मात्र चुकीच्या पद्धतीने लावल्यास ते चेहऱ्यावर घट्ट बसतात, त्यामुळे थोड्या वेळाने मेकअप मधल्या त्रुटी स्पष्ट दिसू लागतात.
* आयब्रो आकर्षक दिसण्यासाठी बऱ्याचदा आपण गडद रंगाची आयब्रो पेन्सिल वापरतो. मात्र त्यामुळे चेहऱ्यावरचे लक्ष हटून आयब्रोवरच लक्ष केंद्रित होते. आयब्रो नैसर्गिक दिसण्यासाठी शक्यतो फिकट रंगाची पेन्सिल वापरावी.
* बऱ्याचदा ओठ आकर्षक दिसण्यासाठी गडद रंगाची लिपस्टिक वापरतो. त्यामुळे मात्र आपल्या सौंदयार्ला हवा तसा लूक मिळत नाही. यासाठी गडद लिपस्टिक लावण्याऐवजी फिक्या रंगाचे ग्लॉसी लिपस्टिक लावावे. यामुळे ओठ अधिक आकर्षक दिसतील.
* डोळ्यांखालची वर्तुळे लपविण्यासाठी आपण बहुतांश आय ग्लीटर लावतो. मात्र त्याऐवजी मॅटे शॅडोजचा वापर करावा. यामुळे डोळयांखालील वर्तुळे लपले जातील व डोळे अधिकच सुंदर दिसतील.