पावसाळा सुरु होताच केसगळतीची समस्या होतीये? करा हे आयुर्वेदिक उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 01:33 PM2018-07-02T13:33:24+5:302018-07-02T13:33:48+5:30
केसगळती रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार केल्यास नक्की फायदा होतो. चला जाणून घेऊया केसगळती रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार....
सतत होणाऱ्या केसगळतीने अनेकांना हैराण केले आहे. ही केसगळती रोखण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. पण त्याने फार फरक बघायला मिळत नाही. पण केसगळती रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार केल्यास नक्की फायदा होतो. चला जाणून घेऊया केसगळती रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक उपचार....
भृंगराज
मजबूत आणि दाट केसांसाठी भृंगराज तेलाचं महत्व आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. भृंगराज तेलामुळे केस वाढतात आणि केस पांढरे होत नाहीत.
ब्राम्ही
ब्राम्ही आणि दह्याचं मिश्रण असलेलं पॅक तयार करुन केसांना लावल्यास केसगळती कमी होते. त्यासोबतच ब्राम्ही तेलाने दररोज केसांची मसाज करा.
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आढळतं. या तेलाने केस वाढण्यात मदत होते. आवळा हिना, ब्राम्ही पावडर आणि दह्यात मिश्रित करुन केसांना लावा.
कडूनिंब
कडूनिंबामुळे केवळ केस दाट आणि चमकदारच होत नाहीतर याने केसांमधील उवाही मरतात. कडूनिंबाचं पावडर तयार करुन खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करुन केसांना लावा.
रीठा
रीठ्याचा वापर केसांना काळे करण्यासाठी आणि केस दाट करण्यासाठी केला जातो. रीठा पावडर तेलात मिश्रित करुन केसांची मसाज करा.