बेकिंग सोड्याच्या मदतीने काही मिनिटात केस करा सिल्की आणि शायनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 01:02 PM2019-02-08T13:02:20+5:302019-02-08T13:09:24+5:30

तुमच्या केसांना धूळ, माती, प्रदूषण यांचा फटका बसतो, ज्याने तुमचे केस निर्जिव आणि रखरखीत होतात.

Baking soda make hair shiny and silky in just one minute | बेकिंग सोड्याच्या मदतीने काही मिनिटात केस करा सिल्की आणि शायनी!

बेकिंग सोड्याच्या मदतीने काही मिनिटात केस करा सिल्की आणि शायनी!

Next

तुमची त्वचा आणि शरीरासारखंच केसांनाही डिटॉक्स होण्याची गरज असते. तुमच्या केसांना धूळ, माती, प्रदूषण यांचा फटका बसतो, ज्याने तुमचे केस निर्जिव आणि रखरखीत होतात. त्यामुळे अनेकजण केस चांगले ठेवण्यासाठी महागातलं महाग शॅम्पू, कंडिशनर आणि सीरम किंवा हेअर प्रॉडक्टचा वापर करतात. पण केस चांगले ठेवण्यासाठी एक चांगला घरगुती उपाय म्हणजे बेकिंग सोडा.  बेकिंग सोड्याच्या मदतीने तुम्ही केस चमकदार आणि मजबूत ठेवू शकता. 

काय होतं बेकिंग सोड्याने?

बेकिंग सोडा अल्कालाइन असतो, ज्याची पीएच लेव्हल ९ असते. त्यामुळे अनेकांना असं वाटतं की, बेकिंग सोड्यामुळे केसांचं नुकसान होतं. पण हे सत्य नाही. पण जेव्हा बेकिंग सोडा पाणी, अॅपल व्हेनेगर किंवा तुमच्या कंडिशनरमध्ये मिसळलं जातं. तेव्हा केस आणखी शायनी आणि सिल्की होतात. 

कसा कराल वापर?

एक मग पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिश्रित करा आणि याने केस चांगल्याप्रकारे धुवा. आता केसांना थोडी मसाज करा आणि त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. नंतर केस स्वत:हून कोरडे होऊ द्या. नंतर केसांना झालेला फायदा तुम्हाला बघायला मिळेल. 

(Image Credit : StylePresso)

तसेच तुम्ही जे कंडिशनर वापरता त्यात एक चमचा बेकिंग सोडा मिश्रित करा. केस शॅम्पूने धुतल्यानंतर हे लावा आणि नंतर केस पुन्हा पाण्याने धुवा.

Web Title: Baking soda make hair shiny and silky in just one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.