दातांवर जमा पिवळा थर झटक्यात होईल दूर, केळीच्या सालीच 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:49 AM2024-10-18T11:49:53+5:302024-10-18T11:50:29+5:30

Teeth Whitening Tips :पिवळे दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही केळीची साल, खोबऱ्याचं तेल आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.

Banana peel for white teeth, yellow teeth home remedies | दातांवर जमा पिवळा थर झटक्यात होईल दूर, केळीच्या सालीच 'असा' करा वापर!

दातांवर जमा पिवळा थर झटक्यात होईल दूर, केळीच्या सालीच 'असा' करा वापर!

Teeth Whitening Tips : दातांची योग्यपणे काळजी घेतली गेली नाही तर दातांवर पिवळा थर जमा होऊ लागतो. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी तर येतेच, सोबतच तुमची स्माईलही खराब होते. तसेच पिवळ्या दातांवरील बॅक्टेरिया पोटात जातात, ज्यामुळे वेगवेगळे आजारही होतात. अशात तुम्हाला जर तुमचे पिवळे दात चमकदार करायचे असतील, तर आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत. पिवळे दात पांढरे आणि चमकदार करण्यासाठी तुम्ही केळीची साल, खोबऱ्याचं तेल आणि बेकिंग सोड्याचा वापर करू शकता.

केळीची साल

केळीच्या सालीचा आतला पांढरा भाग दातांवर घासला तर दात स्वच्छ होतात. नियमितपणे हा उपाय केल्याने दातांवर चमक येते आणि दातांवरील पिवळा थरही दूर होतो.

बेकिंग सोडा

दात चमकदार करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्या देखील वापर करू शकता. यासाठी एका वाटीमध्ये बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या ब्रशवर ठेवून दातांवर हळूहळू घासा. याने दातांचा पिवळेपणा दूर होईल आणि दात चमकदार होतील. दिवसातून एकदा काही दिवस हा उपाय तुम्ही केला तर तुम्हाला फरक दिसेल.

खोबऱ्याचं तेल

पिवळे दात पांढरे करण्याचा हा एक बेस्ट उपाय मानला जातो. खोबऱ्याच्या तेलाने ऑईल पुलिंग करता येते. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे. 2 चमचे खोबऱ्याचं तेल तोंडात ठेवा आणि ते तोंडात सगळीकडे फिरवा. काही दिवस हा उपाय केल्याने दातांवरील पिवळेपणा दूर होईल. तसेच दातांमध्ये अडकलेले कणही निघून जातील. इतकंच नाही तर याने तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होईल. 

स्ट्रॉबेरीज

मॅलिक अॅसिड भरपूर असलेल्या स्ट्रॉबेरीजने देखील तुम्ही दात चमकदार करू शकता. स्ट्रॉबेरीज बारीक करून त्या दातांवर घासा आणि काही वेळ तशाच राहू द्या. त्यानंतर दात पाण्याने स्वच्छ करा. यात तुम्ही थोडा बेकिंड सोडा टाकूनही दातांवर घासू शकता. 

Web Title: Banana peel for white teeth, yellow teeth home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.