केळीची साल आरोग्यवर्धक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2016 12:09 PM2016-09-21T12:09:34+5:302016-09-21T17:39:34+5:30
केळीच्या सालीपासून विविध प्रकारचे फायदे आहेत. त्यामुळे ती साल फेकून न देता त्याचा उपयोग करावा.
Next
1 दात चमकावयचे असतील तर त्यासाठी केळीची साल ही दिवसातून दोन वेळा दातावर घासावी. त्यामुळे आपले दात चमकायला लागतील.
2 काहीवेळा आपल्याला किटक चावल्यामुळे त्वचेवर फोड येऊन, आग व्हायला लागते. अशावेळेला केळीची साल त्या ठिकाणी घासली तर होणारी आग थांबते. तसेच तो फोडही नाहीसा होतो.
3 केळीच्या सालीमुळे बुट व लेदरपासून बनविलेल्या वस्तूही चमकतात. त्याकरिता केळीची साल त्यावरती घासावी.
4 केळीची साल व अंडे मिळून चेहºयावर लावले तर एका आठवड्यातच चेहरा उजळून निघतो.
5 आपल्या चेहºयावर किंवा शरीरावर फोड येत असतील तर त्याकरिता केळीची साल त्यावरती घासावी. त्यामुळे ते फोड नाहीसे होतात.