पांढऱ्या केसांना मेहंदी कशी लावाल? जाणून घ्या पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:24 PM2019-09-04T15:24:59+5:302019-09-04T15:27:52+5:30

केस कलर करण्यासाठी अनेकजण मेंहदीचा वापर करतात. पांढरे केस कलर करण्यासाठी जर केमिकलयुक्त डाय लावण्याचा विचार नसेल तर मेहंदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Basic steps to apply henna for white hair | पांढऱ्या केसांना मेहंदी कशी लावाल? जाणून घ्या पद्धत...

पांढऱ्या केसांना मेहंदी कशी लावाल? जाणून घ्या पद्धत...

googlenewsNext

केस कलर करण्यासाठी अनेकजण मेंहदीचा वापर करतात. पांढरे केस कलर करण्यासाठी जर केमिकलयुक्त डाय लावण्याचा विचार नसेल तर मेहंदी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. केसांना कलर करण्यासोबतच केस दाट करण्यासाठीही मेहंदीचा वापर केला जाऊ शकतो. 

मेहंदीची खासियत ही आहे की, तुम्ही याचा वापर केसांच्या मुळातही करू शकता. मेहंदीमध्ये अ‍ॅंटी-फंगल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणही असतात. जे डोक्याची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. मेहंद योग्यप्रकारे लावून पांढऱ्या केसांना सहजपणे कलर करता येऊ शकतं. त्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. 

चहा पावडरचं पाणी उकडून घ्या - मेहंदी लावण्याआधी याची पेस्ट तयार करणं महत्वाचं आहे. ही पेस्ट तयार करण्यासाठी चहा पॉवडरचं पाणी उकडून घ्या. या पाण्याने मेहंदीची पेस्ट तयार करा.

मेहंदीची पेस्ट तयार करा - मेहंदी पेस्ट तयार करण्यासाठी मेहंदी ८ तासांआधीपासून चहा पावडरच्या पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. त्यात थोडा लिंबाचा रस टाका. तसेच यात पेस्टमध्ये तुम्ही आवळा पावडरही मिश्रित करू शकता. 

कशी लावाल पेस्ट - सर्वातआधी पांढऱ्या केसांना पार्टिशन करून मेहंदी लावा. बाकीचे केस तुम्ही बांधूनही ठेवू शकता. बोटांनी मेहंदी लावण्याऐवजी ब्रशचा वापर केला तर मेहंदी व्यवस्थित लागेल. मेहंदी केसांना लावल्यावर साधारण ३० मिनिटे मेहंदी तशीच राहू द्या. यादरम्यान तुम्ही केस शॉवर कॅपने झाकून ठेवू शकता.

केस धुवा - ३० मिनिटांनंतर केस धुवावे. केस धुतांना मेहंदी पूर्णपणे निघेल याची काळजी घ्यावी. यात जरा वेळ लागू शकतो. पण तो वेळ द्या. केसांना चमकदार करायचं असेल तर केस धुतल्यानंतर केसांना कंडीशनर लावा.

Web Title: Basic steps to apply henna for white hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.