Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 10:25 AM2017-05-30T10:25:10+5:302017-05-30T15:55:10+5:30

दाढी करण्यापूर्वी कोरफडचा गर गालांना व गळ्याला लावल्यास काय फायदे होतात हे जाणून घेण्यास क्लिक करा...

Beauty: Be aware of the benefits of aloe vera before shaving! | Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !

Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !

Next
्याच अशा काही समस्या असतात, ज्यांचा उपाय आपण डॉक्टरांकडे शोधतो. मात्र आयुर्वेदानूसार काही वस्तंूचा योग्य पद्धतीने वापर केल्यास डॉक्टरांकडे जाण्याचीही आवश्यकता भासणार नाही. त्या वस्तूंपैकीच एक म्हणजे कोरफड होय. 
जाणून घेऊया कोरफडचे कोणकोणते फायदे आहेत. 

* ज्या महिलांना मासिक पाळी अनियमित येत असेल त्यांनी रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेतल्यास मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. 

* पाळीच्या वेळी गाठी पडून वेदना होत असल्यास किंवा अंगावरून कमी रक्तस्राव होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.
 
* दाढी करण्यापूर्वी कोरफडचा गर गालांना व गळ्याला लावल्यास दाढी नरम होते शिवाय त्वचादेखील रखरखीत होत नाहीत. शिवाय दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागत नाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.

 * संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.  

* पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे, चेहऱ्याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.
  
* कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

* यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

Web Title: Beauty: Be aware of the benefits of aloe vera before shaving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.