Beauty : ​सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 05:37 AM2017-07-12T05:37:56+5:302017-07-12T11:07:56+5:30

सेलिब्रिटींच्या सौंदर्याचे गुपित म्हणजे घरगुती उपाय होय. चला जाणून घेऊया त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोणते घरगुती उपाय कराल.

Beauty: Beautiful skin like celebrity, make home remedy! | Beauty : ​सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय !

Beauty : ​सेलिब्रिटींसारखी सुंदर त्वचा हवीय, करा हे घरगुती उपाय !

Next
लिवूडच्या सेलिब्रिटींचे सौंदर्य पाहून कोणत्याही मुलीला त्यांचा हेवा वाटू शकतो. एवढी सुंदर त्वचा आपलीही असावी आणि आपणही त्यांच्यासारखे सुंदर व आकर्षक दिसावे असे न वाटणे अशक्यच. कारण प्रत्येक महिलेस असे वाटते की, आपण नेहमी तरुण आणि सुंदर दिसावे. आपणास कदाचित माहित नसेल की सेलिब्रिटींच्या या सौंदर्याचे गुपित म्हणजे घरगुती उपाय होय. चला जाणून घेऊया आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी कोणते घरगुती उपाय कराल. 

* एक चमचा मुलतानी माती, एक चमचा टोमॅटोचा गर किंवा एक चमचा तुरटी घेऊन या तिघांना एकत्र करुन पेस्ट तयार करावी. या पेस्टला चेहऱ्यावर चांगल्याप्रकारे लावावी. १० मिनिटानंतर थंड पाण्याने धुवावी. या प्रयोगानेही मोकळे रोमछिद्रे संकुतिच होतात.  

* एक चमचा काकडीचा रस, एक अंड्याचा पांढरा बलक, एक चमचा लिंबूचा रस किंवा चिमूटभर काळी मिरी घेऊन तिघांना चांगल्याप्रकारे एकत्र करा. या पेस्टला चेहऱ्यावर उटण्यासारखे लावावे. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे मोकळे झालेले रोमछिद्रे बंद होण्यास मदत होते. 

* एक चमचा गुलाबजल, अर्धा चमचा काकळीचा रस आणि थोडीशी शुद्ध बेन्जोइन घेऊन तिघांना चांगल्याप्रकारे एकत्र मिसळा. या मिश्रणाने चेहरा चांगला स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्याची स्वच्छता तर होतेच शिवाय रोमछिद्रे संकचितदेखील होतात.  

* मोकळ्या रोमछिद्रयांवर स्ट्रॉबेरीचा गर लावावा. हा प्रयोग मोकळ्या रोमछिद्रांच्या समस्येवर प्रभावी उपाय आहे.    

Also Read : ​Beauty Tips : सुंदर त्वचेसाठी सेलिब्रिटींच्या डायटमध्ये असतात ‘हे’ सहा पदार्थ !
                   : ​Beauty Tips : ​त्वचेच्या प्रत्येक समस्यांवर 'हे' आहेत परफेक्ट घरगुती उपाय !

Web Title: Beauty: Beautiful skin like celebrity, make home remedy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.