Beauty : ​डेली शेविंग केल्यास होईल नुकसान, जाणून घ्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2017 07:56 AM2017-07-21T07:56:39+5:302018-06-23T12:04:13+5:30

आपणही डेली शेविंग करत असाल तर होणाऱ्या या नुकसानाबाबत नक्कीच माहित असायला हवे.

Beauty: Daily shaving will cause harm, know! | Beauty : ​डेली शेविंग केल्यास होईल नुकसान, जाणून घ्या !

Beauty : ​डेली शेविंग केल्यास होईल नुकसान, जाणून घ्या !

Next
्याचदा आपण सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसावे म्हणून रोज शेविंग करतो. विशेषत: कॉलेज तरुण सेलेब्सचे अनुकरण करुन नेहमी शेविंग पार्लरमध्येच दिसतात. मात्र डेली शेविंग केल्याने त्वचेचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

शेविंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते, ज्यामुळे त्वचेवर वाईट परिणाम होणार नाहीत. त्यात शेविंग करताना घाई करु नये, नियमित शेविंग टाळावी, शेविंग करतेवेळी गार पाणी टाळावे, शिवाय स्वस्त क्रिमचा वापर करु नये. याव्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेला इजा होणार नाही. जाणून घेऊया, शेविंग करताना काय काळजी घ्यावी.

* रोज शेविंग केल्याने त्वचेचे नैसर्गिक आॅइल नष्ट होते, याचा परिणाम त्वचेवर होऊन त्वचा ड्राय होते आणि भविष्यात त्वचेवर लवकर सुरकुत्या पडू लागतात. त्यामुळे आठवड्यातून किमान ५ वेळाच शेविंग करावी. 

* बरेचजण शेविंगच्या अगोदर चेहरा गार पाण्याने धुतात. मात्र असे केल्याने पोर्स आकसतात ज्यामुळे शेविंग व्यवस्थित होत नाही. 

* शेविंग स्मूथ होण्यासाठी चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि त्यानंतर ग्लिसरिनयुक्त मॉइश्चरायजर लावा. यामुळे शेविंग स्मूथ तर होईल शिवाय स्किनमध्ये जळजळ होणार नाही.  

* शक्यतो शेविंगसाठी स्वस्त क्रीमचा वापर करु नका. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेची पोत खराब होते. त्वचेला हायड्रेट आणि मॉश्चर करणाऱ्या क्रीमचाच वापर करावा.

* शेविंगनंतरची जळजळ टाळण्यासाठी हलक्या हातांनी करावी. यामुळे त्वचा कापण्याचीही भीती नसते. 

* शेविंग करण्याची पद्धत चुकली की, हेअर फॉलिक्सल डॅमेज होऊन चेहऱ्यावर पुरळ तयार होतात. हे टाळण्यासाठी दाढीच्या डायरेक्शनमध्ये शेविंग करावी. 

* प्रत्येक स्ट्रोकनंतर ब्लेड पाण्यात बुडवा, यामुळे पुढचा स्ट्रोक स्मूथ राहील. शिवाय ब्लेडचा स्मूथनेस टिकून राहतो. 

* शेविंगनंतर चेहऱ्यावर लोशन लावू नका. त्याऐवजी शेव बाम वापरु शकता. हा अल्कोहोल फ्री असल्याने त्याचे साइड इफेक्ट होत नाहीत. 

Also Read : ​BEAUTY TIPS : ​शेविंग करण्याअगोदर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होणार नुकसान !
                   : ​Beauty : ​दाढी करण्यापूर्वी कोरफड लावल्यास होणारे फायदे जाणून व्हाल थक्क !

Web Title: Beauty: Daily shaving will cause harm, know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.