Beauty : दाट व आकर्षक पापण्यांसाठी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 07:27 AM2017-11-23T07:27:35+5:302018-06-23T12:03:28+5:30
आज प्रत्येक तरुणीला वाटते की आपले डोळेही सेलिब्रिटींसारखे आकर्षक असावे. त्यासाठी बहुतांश तरुणी मेकअपचा आधारही घेतात, मात्र हा आधार काहीअंशी तात्पुरता असतो.
Next
आ प्रत्येक तरुणीला वाटते की आपले डोळेही सेलिब्रिटींसारखे आकर्षक असावे. त्यासाठी बहुतांश तरुणी मेकअपचा आधारही घेतात, मात्र हा आधार काहीअंशी तात्पुरता असतो. विशेष म्हणजे आपले डोळे आकर्षक दिसण्यासाठी पापण्या दाट असणे खूप आवश्यक असते. दाट पापण्यांमुळे डोळ्यांची आकर्षकता वाढते आणि यामुळे आपले सौंदर्य खुलण्यास मदत होते. जाणून घेऊ या आकर्षक व दाट पापण्यांसाठी काय कराल...
चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच डोळ्यांचे सौंदर्य खुलविण्यासाठी पापण्यांचे खूपच महत्त्व आहे. बऱ्याचजणांच्या पापण्या विरळ असतात, त्यामुळे त्यांच्या सौंदर्यावर परिणाम होतो. यासाठी ते मेकअपवर अधिक लक्ष देतात किंवा कृत्रिम पापण्या वापरतात. मात्र काही घरगुती उपाय केल्यास एवढा खटाटोप करण्याची आवश्यकता नाही.
* काय कराल घरगुती उपाय ?
* दोन चमचे एरंडेलचे तेल घेऊन पाच मिनिट मंद आचेवर गरम करा. नंतर आच बंद करून तेल गार होऊ द्या. यात आढळणारे अँटीआॅक्सिडेंट रोम विकसित करण्यात मदत करतील आणि पापण्या दाट करतील.
* व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. सुईने त्यात छिद्र करून जेल बाहेर काढा. एका चमच्यात घेऊन कस्टर आॅयलसोबत मिसळून घ्या. ही पेस्ट पापण्यांवर लावल्यास दाट होण्यास मदत होते.
* कोरफडाचे पान घेऊन त्याचे जेल काढा आणि चमच्यात घेतलेल्या मिश्रणात फेटून घ्या. या मिश्रणात एक चमचा पेट्रोलियम जेली मिसळू शकतात. याने पापण्या गळत नाही आणि दाट होतात. ब्रशच्या मदतीने हे मास्क पापण्यांवर लावा. हे लावण्यापूर्वी आपल्याला पापण्या ब्रशने स्वच्छ कराव्या लागतील. हे मिश्रण आयब्रो वरही लावू शकता. हे मास्क रात्रभर असेच राहू द्या. सकाळी आपल्याला आपल्या आयब्रो आणि पापण्या नरम वाटतील. हवं असल्यास तीस सेकंद मास्क ने मसाज करू शकता. हे मास्क फ्रीजमध्ये ठेवू शकता. अप्लाय करण्याच्या काही वेळापूर्वी बाहेर काढावे. एक महिन्यापर्यंत वापरण्याने फरक कळून येईल. हे मास्क वापरताना इतर केमिकल वापरणे टाळावे. यासह प्रोटीन आणि व्हिटॅमिन आढळणाऱ्या आहाराचे सेवन करावे.