रात्री उशिरापर्यंत जागल्यानंतरही त्वचा दिसेल तजेलदार; वापरा 'या' टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 12:41 PM2019-03-02T12:41:01+5:302019-03-02T12:41:19+5:30
आपण अनेकदा थोरामोठ्यांकडून ऐकत असतो की, मोबाइल म्हणजे आताच्या पिढीला मिळालेला शाप आहे... यांना मोबाइल सोडून काही दिसतचं नाही. अशा अनेक गोष्टींचा पाढा ते सतत वाचत असतात.
आपण अनेकदा थोरामोठ्यांकडून ऐकत असतो की, मोबाइल म्हणजे आताच्या पिढीला मिळालेला शाप आहे... यांना मोबाइल सोडून काही दिसतचं नाही. अशा अनेक गोष्टींचा पाढा ते सतत वाचत असतात. पण आपल्यावर मात्र या गोष्टींचा काहीही परिणाम होत नसतो. अनेकदा दिवसभराच्या थकव्यानंतर अंथरूणात पडल्यावरही आपल्या हातातला मोबाइल काय सुटत नाही. रात्रभर सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर सर्फिंग करताना आपण विसरून जातो की, आपल्या शरीरासोबतच आपल्या त्वचेलाही झोपेची गरज असते. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर त्याची लक्षणं सर्वात आधी आपल्या त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसू लागतात. अशातच सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होऊन त्वचा निस्तेज दिसू लागते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होण्यासोबतच सूजही दिसू लागते. स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि लॅपटॉपची सवय आपल्याला सोडवत नाही. अशातच काही सोप्या गोष्टींमुळे तुम्ही रात्रभर जागल्यानंतरही तुमच्या त्वचेवरील ग्लो टिकवून ठेवू शकता.
स्क्रब
स्क्रब केल्याने त्वचेवरील ब्लड सर्क्युलेशन वाढतं. त्वचा एक्सफोलिएट केल्यानेही त्वेचमधील ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होते. रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे त्वचेमधील ब्लड सर्क्युलेशनवर परिणाम होतो. ज्यामुळे त्वचेचा ग्लो नाहिसा होण्यास मदत होते. त्यामुळे शुगर स्क्रब किंवा एक्सफोलिएटच्या मदतीने त्वचेला स्क्रब करा.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरत असून यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी हे मदत करतात. लिंबामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे एक ग्लास हलक्या गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करून त्याचे सेवन करा. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मची पातळी वाढण्यासाठी मदत होते.
बर्फ
रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे त्वचेवर सूज येते आणि त्वचा लालसर दिसू लागते. यावर बर्फ सर्वात प्रभावी उपचार आहे. हे स्किन इरिटेशन कमी करण्यासाठी मदत करून त्वचेचा रंग उजळवण्यासही मदत करतो. आइस ट्रेमध्ये दूध एकत्र करून आइस क्यूब्स तयार करा आणि स्किनवर रब करा. आइस ट्रेमध्ये दूध एकत्र करून आइ क्यूब तयार करा आणि स्किनवर रब करा. यामुळे त्वचेचा ग्लो वाढतो आणि सुरकुत्या, सूज कमी करण्यासाठी मदत करतो.
कोरफडीचा ज्यूस
कोरफडीचा ज्यूस स्किन इरिटेशन कमी करतं आणि चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी मदत करतं. कोरफडीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट्स, अॅन्टी-सेफ्टिक, अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेवर दिसणारी वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचा डिटॉक्सीफाय करण्यासाठी ताजा कोरफडीचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. हा ज्यूस शरीराची ऊर्जा वाढविण्यासाठी मदत करतो.
पाणी प्या
तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागत असाल किंवा नसाल तरिही त्वचा हायड्रेट ठवणं अत्यंत आवश्यक असतं. दिवसभरामध्ये 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक ठरतं. त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी प्या.