Beauty : फक्त एका आठवड्यात फ्रेश लुक मिळण्यासाठी... !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 09:30 AM2017-09-03T09:30:48+5:302017-09-03T15:08:38+5:30
आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्यामुळे तुम्ही फक्त एका आठवड्यात फ्रेश लुक मिळवू शकता.
Next
ए ाद्या अभिनेत्रीसारखे आपणही सुंदर दिसावे, असे बहुतांश महिलांना वाटते. त्यासाठी त्या विशेषत: पुरुषांच्या तुलनेने आपल्या सौंदर्याची काळजी जास्त घेताना दिसतात. मात्र आता पुरुषही आपल्या सौंदर्याविषयी खूप जागरुक झाले आहेत. एखाद्या अभिनेत्यासारखे आपणही स्मार्ट दिसावे असे पुरुषाला वाटू लागले आहे. त्यानुसार बहुतांश पुरुष फ्रेश त्वचा मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. महागडे फेअरनेस क्रिम पासून ते जेन्ट्स पार्लरचाही आधार घेताना दिसतात. मात्र काही घरगुती उपाय केल्यास पुरुषही सेलिब्रिटींसारखे सुंदर दिसू शकतात. आम्ही आपणास काही टिप्स देत असून त्यामुळे तुम्ही फक्त एका आठवड्यात फ्रेश लुक मिळवू शकता.
* बदाम, चंदन, कडुलिंबाची पाने आणि हळद
चेहरा तेजस्वी होण्यासाठी वरील घटकांचे एकत्रित मिश्रण तयार करा. हे तयार झालेले मिश्रण दुधाबरोबर मिक्स करुन चेहऱ्याला लावा. यानंतर १५ मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्यास तुमची त्वचा चमकदार दिसले.
* डाळीचे पीठ आणि दही
डाळीचे पीठ आणि दही मिक्स करुन चेहऱ्याला लावल्यानंतर त्यातील पोषक घटकांमुळे चेहरा चमकदार होतो.
* लिंबाचा रस
त्वचा ब्लीच करण्याचा हा अगदी सोपा उपाय आहे. लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असल्याने त्यामुळे त्वचेचे ब्लीच होते. शिवाय लिंबाचा रस चेहाऱ्याला लावल्यास त्वचा स्वच्छ होते. यामुळे ब्लॅक स्पॉटही येत नाहीत.
* चुना आणि मध
चेहऱ्याची त्वचा उजाळण्यासाठी चुना आणि मधाचा वापर करावा. अगदी थोडासा चुना घेऊन यात मध मिक्स करा. हे चेहऱ्याला लावल्यास काही आठवड्यातच तुमची त्वचा उजळेल.
* आॅलिव्ह तेल
आॅलिव्ह तेलाने मसाज केल्यास त्वचा सतेज दिसते शिवाय सुरकुत्याही दूर होण्यास मदत होते.
* कोरफड
यामध्ये अँटी आॅक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे त्वचा चांगल्या प्रकारे मॉईश्चराइझ होते.
Also Read : Smart Tips : पुरुषांनो, काळानुसार स्मार्ट दिसायचे आहे ना? मग असा करा स्वत:मध्ये बदल !