​Beauty : निरोगी केसांसाठी घरगुती आवळा हेअर मास्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 09:16 AM2017-10-03T09:16:41+5:302018-06-23T12:03:37+5:30

बहुतांश मुली निरोगी केसांसाठी महागडे उपाय करतात. मात्र केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेला घरगुती हेअर मास्क फायदेशीर ठरु शकतो.

Beauty: Healthy Hair Household Household Mask! | ​Beauty : निरोगी केसांसाठी घरगुती आवळा हेअर मास्क !

​Beauty : निरोगी केसांसाठी घरगुती आवळा हेअर मास्क !

Next
ट आणि काळे केस हे निरोगी समजले जातात. निरोगी केसांसाठी आज सर्वच सेलिब्रिटी काळजी घेताना दिसतात. त्यांचे चमकदार आणि निरोगी केस पाहून प्रत्येक मुलीला असे वाटते की, आपलेही असे केस असावेत. त्यासाठी बहुतांश मुली महागडे उपायही करतात. मात्र केसांच्या आरोग्यासाठी आवळ्याने तयार केलेला घरगुती हेअर मास्क फायदेशीर ठरु शकतो. 
  
आवळा केस गळणे थांबवतं आणि केसांना दाट करण्यात मदत करतं. कोणत्याही भाजीपाला आणि फळांच्या तुलनेत आवळ्यात सर्वात अधिक मात्रेत व्हिटॅमिन आढळतं. ज्याने केसांचे कॉलेजन स्तर वाढतं आणि केस गळणे कमी होतं. आवळ्यात अँटीआॅक्सीडेंट भरपूर मात्रेत असतं, म्हणून हे लावल्याने केसांना खूप फायदा होतो. आवळ्याचा रस केसांचा मुळात लावल्याने डेंड्रफची समस्या दूर होते. याने नवीन केसही उगवतात. आपल्याला जलद परिणाम हवे असल्यास रोज एक उकळलेला आवळा खायला हवा. याव्यतिरिक्त आपण घरी हेअर मास्क तयार करू शकता. 

* केसांसाठी तेल
एक कप नारळ तेल गरम करून त्यात ४-५ आवळे आणि ५-६ जास्वंदीचे पान टाका. २० मिनिट उकळी घ्या नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी तसेच राहू द्या. गार झाल्यावर एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा. दर दोन दिवसाने याने मालीश करा.

* हेअर मास्क 
एक चमचा मेथीदाणा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा, सकाळी याची पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये एक चमचा आवळा पावडर आणि एक चमचा दही मिसळा. ही पेस्ट केसांना लावून एक तासासाठी तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुऊन टाका.   

Also Read : ​Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !
                    : Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !

Web Title: Beauty: Healthy Hair Household Household Mask!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.