Beauty : अस्सल महाराष्ट्रीयन रूबाबदार दाढीसाठी करा हे घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2017 07:37 AM2017-07-14T07:37:09+5:302017-07-14T13:09:49+5:30

आपणासही झटपट दाढी वाढवायची असेल तर हे काही सहजसोपे घरगुती उपाय फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल.

Beauty: Home Remedies for a genuine Maharashtrian Beard! | Beauty : अस्सल महाराष्ट्रीयन रूबाबदार दाढीसाठी करा हे घरगुती उपाय !

Beauty : अस्सल महाराष्ट्रीयन रूबाबदार दाढीसाठी करा हे घरगुती उपाय !

Next
ong>-रवींद्र मोरे 
रूबाबदार दाढी आणि पिळदार मिशा हे अस्सल महाराष्ट्रीयन पुरूषाची ओळख समजली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील चित्रपटात मराठमोडा अभिनेता रितेश देशमुख हा मुख्य भूमिका साकारणार आहे. रितेशने या चित्रपटासाठी आपला लूक बदलला असून त्यात तो रूबाबदार दाढीत दिसणार आहे. 

बरेच महाराष्ट्रीयन तरुणांना रूबाबदार दाढी आणि पिळदार मिशांचे आकर्षण वाटते. आपणासही झटपट दाढी वाढवायची असेल तर हे काही सहजसोपे घरगुती उपाय दिले असून ते फॉलो केल्यास नक्कीच फायदा होईल. 



* आवळ्याचे तेल 
आवळा हे दाढी झटपट वाढवण्यास मदत करते. या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.
मोहरीच्या पानांची पेस्ट करून त्यात आवळ्याच्या तेलाचे थेंब मिसळा. तयार मिश्रण १५ मिनिटांनी चेहऱ्याला लावा थोड्यावेळाने चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून ४ वेळा केल्यास तुम्हाला दाढीच्या वाढत्या केसांमधला फरक जाणवेल. हे तेल मोहरीच्या पानाच्या पेस्टबरोबरही लावू शकता. 

* नारळाचे तेल
नारळाचे तेलामुळे दाढीची वाढ चांगल्या प्रकारे होते, त्यासाठी १० भाग नारळाचे तेल आणि १ भाग ‘रोझमेरी तेल’ घेऊन दाढीवर प्रयोग केल्यास दाढीचे केस वाढण्यास मदत होते. शिवाय यामुळे चेहऱ्याचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. हे तेलाचे मिश्रण कापसाच्या बोळ्यावर घेवून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

* निलगिरी तेल 
रोझमेरी तेलाप्रमाणे, निलगिरी तेल ही दाढीच्या केसांची वाढ होण्यास मदत करते. पण या तेलामुळे चेहऱ्याची आग होते.  म्हणूनच या तेलाबरोबर आॅलिव्ह आॅईल किंवा तीळाच्या तेलाचे काही थेंब एकत्र करा. अर्धा कप आॅलिव आॅईल किंवा तीळाच्या तेलाबरोबर १५ थेंब निलगिरीच्या तेलाचे मिश्रण करा. तयार मिश्रण एकत्र करून चेहऱ्याला लावा. ३० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. जर चेहरा तेलकट वाटत असेल तर तो साबणाने पुन्हा धुवा.

* तमालपत्र आणि लिंबू
तमालपत्राची पावडर आणि दोन चमचे लिंबाचा रस हे मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हा उपाय सगळ्यांनाच लागू पडत नाही. कारण काही जणांच्या त्वचेला लिंबाचा रस संवेदनशील ठरण्याची शक्यता असते. जर तुम्हांला काही त्रास झाल्यास हे मिश्रण लावू नका. तर इतरांनी हे मिश्रण आठवड्यातून दोनवेळा चेहरयाला लावा.

Also Read : ​Beauty Tips : रुबाबदार दाढीसाठी सेलिब्रिटीदेखील करतात हे उपाय !
 

Web Title: Beauty: Home Remedies for a genuine Maharashtrian Beard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.