BEAUTY : लिपस्टिक कसे लावाल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 01:08 PM2017-03-22T13:08:16+5:302017-03-22T18:39:57+5:30

महिलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक होय. मग एखादी छोटी पार्टी असो की, मोठा कार्यक्रम तिथे जाण्यासाठी मेकअपसह लिपस्टिक आवर्जून लावली जाते.

BEAUTY: How to lipstick? | BEAUTY : लिपस्टिक कसे लावाल ?

BEAUTY : लिपस्टिक कसे लावाल ?

Next
िलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे लिपस्टिक होय. मग एखादी छोटी पार्टी असो की, मोठा कार्यक्रम तिथे जाण्यासाठी मेकअपसह लिपस्टिक आवर्जून लावली जाते. मात्र लिपस्टिक लावण्याच्याही काही पद्धती असतात, त्या जाणून घेऊया. 

जाड किंवा लांब ओठ असणाऱ्यानी लिपस्टिक लावताना विशेष काळजी घ्यायला हवी. आपले ओठ जाड असतील तर लिप लायनरच्या मदतीने बारीक, अरूंद आऊटलाईन काढून घ्यावी. अन्यथा ओठ खूप जाड दिसतात. लांब ओठ असलेल्यांनी जाडसर आऊटलाईन काढावी. 

याचप्रमाणे आऊटलाईन काढताना योग्य काळजी घ्यावी. आऊटलाईनसाठी वापरण्याचा रंग फिका असावा. प्रसंगाला साजेसा आणि तुमच्या कपड्यांवर शोभून दिसेल असाच रंग निवडा. जर गडद रंगाचे लिपस्टिक असेल तर हलक्या रंगाचे लाईनर असावे.

आजकाल अनेकजणी क्रीम बेस लिपस्टिक लावणे पसंत करतात. हे सुंदर व ट्रेंडी दिसते. हे दीर्घकाळ फ्रेश दिसते. लिपस्टिक विविध रंगात उपलब्ध असतातपरंतु ते वापरताना अधिक सतर्क राहणे आवश्यक असते. जर लिपस्टिक तुमच्या ओठांची ठेवण व त्वचेच्या रंगाला शोभत नसेल तर ते विचित्र दिसते. तोच रंग वापरण्याऐवजी नियमितपणे रंग बदलवा. लिपस्टिक जास्त काळ टिकण्यासाठी एक मिनिटाने ओठांना आईसक्रीम लावा. असे केल्याने लिपस्टिक जास्त काळ टिकून राहील.

Web Title: BEAUTY: How to lipstick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.