Beauty : ​चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2017 09:15 AM2017-05-24T09:15:00+5:302017-05-24T14:45:00+5:30

चेहऱ्यावरील चमक कायम राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे.

Beauty: Increase the brightness of the face ..! | Beauty : ​चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!

Beauty : ​चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!

googlenewsNext
या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चमक नसेल त्याचे मानसिक अणि शारीरिक आरोग्य सुदृढ नसते असे म्हटले जाते. कारण काहीही व्याधी असल्यास त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो. यासाठी चेहऱ्यावरील चमक कायम राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असायला हवे. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीरावर सतत घाम येतो. त्या घामाद्वारे त्वचेवर तेल साचते आणि त्यामुळे संक्रमण होते. शिवाय बाहेरील उघडल्यावरचे खाणे, धुम्रपान, मद्यपान आणि वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो आणि त्वचेचे आरोग्य खराब होते. त्यामुळे या दिवसात पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेट्सचा त्रास अधिक होतो. 

काय उपाय कराल?
शरीरातील कोलाजेनच्या कमतरतेमुळेदेखील तुमची त्वचा रुक्ष होऊन सुरकुत्या येऊ शकतात. शरीरात कोलाजेनचं प्रमाण कमी असल्यास व्हिटॅमिन 'सी' मिळवण्या करता तुम्ही आहारात संत्री, द्राक्षे, पपई, केळे याचा जास्त वापर करा. तसंच व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. याचबरोबर चेहऱ्यावरील तेलगटपणादेखील कमी करण्याचा प्रयत्न करावा. यासाठी गरम पाण्यात रेश्माचं कापड भिजवून ते फिरवावं. रेश्माच्या कापडामुळे चेहऱ्यावर जमा झालेलं तेल शोषलं जातं. यामुळे त्वचा आणखी उजळ आणि तेजस्वी दिसण्यास सुरुवात होते.  

Web Title: Beauty: Increase the brightness of the face ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.