​Beauty : करिना कपूरने केस गळतीची समस्या अशी केली दूर !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 12:07 PM2017-09-09T12:07:34+5:302017-09-09T17:37:34+5:30

करिनाने बरेच उपाय केले ज्यामुळे तिची केस गळतीची समस्या दूर झाली. जाणून घेऊया करिनाने काय उपाय केले.

Beauty: Kareena Kapoor has removed the problem of hair leakage! | ​Beauty : करिना कपूरने केस गळतीची समस्या अशी केली दूर !

​Beauty : करिना कपूरने केस गळतीची समस्या अशी केली दूर !

Next
्या दिवसेंदिवस केस गळतीची समस्या वाढतच असून महिला असो वा पुरुष दोघांनाही ही समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे. या समस्येचे मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली, अपौष्टिक खाणे, प्रदूषित वातावरण आणि हार्माेनल बदल होय. महिलांचे के स विशेषत: प्रेग्नन्सीनंतर जास्त गळण्यास सुरूवात होते. बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस करिना कपूरही प्रेग्नन्सीनंतर केस गळतीच्या समस्येने त्रस्त होती. याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या लाइव्ह इंटरव्यू मध्ये केला. वातावरणाच्या बदलाने असे होत आहे की, अन्य कारणाने हे तिला समजत नव्हते, मात्र हा अनुभव खूपच वाईट असल्याने तिने सांगितले.  
या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी करिनाने आपल्या आहारात मोठा बदल केला, ज्यामुळे तिला आराम मिळाला. याव्यतिरिक्त तिने बरेच उपाय केले ज्यामुळे तिची केस गळतीची समस्या दूर झाली. जाणून घेऊया करिनाने काय उपाय केले.  

* केस गळतीपासून सुटका मिळण्यासाठी रोज मसाज करणे आवश्यक आहे. आपण घरी किंवा पार्लरमध्ये जाऊन हेड मसाज करु शकता.  
* आपल्या दिनचर्येत नारळाचा समावेश करावा. नारळापासून बनलेले पदार्थांचे सेवन करु श्कता. यामुळे केस गळती तर थांबेल शिवाय अकाळी केस पांढरे होणे थांबतील.  
* काळे तीळदेखील केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. काळे तीळचा वापर आपण दाळ किंवा भाज्यांमध्ये टाकून सेवन करू शकता.  
* डायटमध्ये चिप्स आणि चिया पुडिंग्सचा समावेश अजिबात नको. यामुळे केसांना अजिबात पोषकत्त्व मिळत नसून हानी पोहचते आणि केस गळती होते. 
करिना कपूरच्या या टिप्स आपणही फॉलो केल्यास केस गळतीची समस्या दूर होईल. 

Also Read : ​Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !
                   : ​Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !

Web Title: Beauty: Kareena Kapoor has removed the problem of hair leakage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.