​Beauty : घरीच बनवा नैसर्गिक हेअर डाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 09:42 AM2017-08-18T09:42:26+5:302018-06-23T12:04:02+5:30

घरगुती काही वस्तूंच्या साह्याने आपण नैसर्गिक डाय करु शकता आणि केसांना आकर्षक बनवू शकता.

Beauty: Make Your Own Natural Hair! | ​Beauty : घरीच बनवा नैसर्गिक हेअर डाय !

​Beauty : घरीच बनवा नैसर्गिक हेअर डाय !

लिब्रिटींचे डाय केलेले केस पाहून आपल्यालाही त्यांचा हेवा वाटतो. आपलेही केस विविध रंगाच्या शेडने आकर्षक दिसावेत म्हणून केसांना डाय करतो,  मात्र बऱ्याचजणांना के मिकल डायची अ‍ॅलर्जी होते. त्यामुळे डाय करण्याची इच्छा असूनही आपण डाय करु शकत नाही. पण आता घरगुती काही वस्तूंच्या साह्याने आपण नैसर्गिक डाय करु शकता आणि केसांना आकर्षक बनवू शकता.  

* असा बनवा नैसर्गिक डाय...
लसूण जास्त प्रमाणात घेऊन त्यांना सोलून घ्या. सोललेले लसूण काळा रंग होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले लसूण गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करा आणि तलम वस्त्राने गाळून घ्या. यामुळे लसणाची बारीक पावडर मिळेल. या पावडरमध्ये आॅलिव्ह आॅईलमध्ये मिसळून घट्ट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवावे. मात्र ते फ्रिजमध्ये ठेवू नये. सात दिवसांनंतर डब्याचे झाकण उघडावे. आता ही पेस्ट लेप स्वरूपात केसांवर लावण्यास तयार आहे. 

* केसांना कशी लावाल?
तयार झालेली ही पेस्ट रात्री झोपताना केसांवर लावावी. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याने स्वच्छ धुवावी. 
रात्री झोपताना केसांवर या पेस्टचा लेप द्यावा. दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाकावा. शक्य असेल तर दुसऱ्या दिवशी केस धुवू नयेत. हा लेप केसात मुरायला हवा. धुतल्यानंतर केस काळे झालेले दिसतीलच त्याप्रमाणे चमकही वाढलेली दिसेल. विशेष म्हणजे केसांची कुठलीच हानी होत नाही आणि हा डाय बराच काळ टिकतोही. शिवाय केसांचे आरोग्यही सुधारते. केस दीर्घकाळ काळे आणि सतेज रहावे. यासाठी आहारामध्ये लोह, आयोडीन आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असावा.

Also Read : ​Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !
                   : ​Beauty : डोक्यावर नवे केस हवे असल्यास या तेलाचा असा करा वापर !

Web Title: Beauty: Make Your Own Natural Hair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.