Beauty : ​गुलाब तेलाने खुलवा सौंदर्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:22 PM2017-11-24T13:22:55+5:302018-06-23T12:03:23+5:30

गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. जाणून घेऊया गुलाबाच्या तेलाचे फायदे.

Beauty: Rose oiled beauty! | Beauty : ​गुलाब तेलाने खुलवा सौंदर्य !

Beauty : ​गुलाब तेलाने खुलवा सौंदर्य !

Next
रदुषण तसेच वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो, त्यामुळे त्वचेसंदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. यावर उपाय म्हणून आपण बरेच महागडे प्रयोग करतो, मात्र त्वचेच्या समस्यांवर गुलाबाचे तेल वरदान ठरु शकते. कारण गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. जाणून घेऊया गुलाबाच्या तेलाचे फायदे. 

* गुलाबाच्या तेलात अँटीआॅक्सीडेंट गुण आढळतात जे त्वचेहून फ्री रॅडिकल हटवतात. याने रोम छिद्रात घाण जमत नाही आणि त्वचा स्वच्छ राहण्यात मदत मिळते.

*  गुलाबाच्या तेलात सूज कमी करणारे अँटीव्हायरस गुण असतात जे जळजळ आणि सुजेत फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या तेलाचे काही थेंब जळजळत असलेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. जळजळ कमी करण्यासाठी गुलाबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळावे आणि या तेलाने जळत असलेल्या भांगेवर हलकी मालीश करावी.

* गुलाबाच्या तेलाने पिंपल्स नाहीसे होतात आणि त्वचा डागरहित होते. यात अँटीव्हायरस आणि प्रतिजैविक गुण असल्यामुळे डाग आणि पिंपल होण्यापासून मुक्ती मिळते.

* गुलाबाचं तेल त्वचेचा पीएच स्तर नियमित करतं त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्वचेला नमी मिळते. आपण यासाठी नियमित क्रीममध्ये तेल मिसळून चेहºयावर लावू शकता.

* यात अँस्ट्रिंजेंट गुण असल्याने हे चेहऱ्यावरील खोल झालेले छिद्र लहान करण्यात मदत करतं. ३० हून अधिक वय झाल्यावर गुलाब जलदेखील फायदेशीर ठरतं. याने पिंपल्स होण्याची शक्यताही कमी होते.

* त्वचेला हायड्रेंट करण्यासाठी गुलाबाच्या तेलात जरा पाणी मिसळून घ्या. हे फाउंडेशन लावण्यापूर्वी लावा. याने चेहऱ्यावर बेस बनण्यात मदत मिळते. जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत तेलाची मालीश करणे आवश्यक आहे.

* गुलाबाच्या तेलाने रुक्ष, बेजना आणि सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर लाभ होतो. गुलाबाच्या तेलाने मालीश केल्यावर वय कमी दिसू लागतं. याने चेहºयावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या नाहीशा होतात.

* अनेक लोकांच्या डोळ्याखाली त्वचा रुक्ष असते. त्यावर गुलाबाचे तेल फायदेशीर ठरतं. याने कोरडेपणा दूर होऊन त्वचा नरम पडते.   

Web Title: Beauty: Rose oiled beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.