वयाच्या चाळीशीमध्ये 30 पेक्षा कमी दिसायचंय?; करिश्मा कपूरचे 'हे' ब्युटी सीक्रेट्स ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 02:51 PM2019-07-27T14:51:35+5:302019-07-27T14:53:11+5:30
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर 44 वर्षांची आहे. पण आजही तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. वयाची चाळीशी पार केल्यानंतरही करिश्मा अत्यंत सुंदर दिसते.
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर 44 वर्षांची आहे. पण आजही तिच्याकडे पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. वयाची चाळीशी पार केल्यानंतरही करिश्मा अत्यंत सुंदर दिसते. जरी आता ती बॉलिवूडपासून लांब असली तरिही बॉलिवूडच्या अनेक फक्शन्स आणि बॉलिवूड पार्टीमध्ये ती हजर असते. असं असलं तरिही करिश्माच्या चाहत्यांची संख्या काही कमी झालेली नाही. आज आपण करिश्माचे ब्युटी सीक्रेट्स जाणून घेणार आहोत. वयाच्या 44व्या वर्षी करिश्मा कशी आपल्या त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी काय उपाय करते, ते तुम्हीही फॉलो करू शकता.
1. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स
कॉस्मेटिक असो किंवा स्किन केअर, बाजारातील कोणतंही प्रोडक्ट वापरण्याआधी करिश्मा चेक करते की, ते ऑर्गॅनिक आहेत की नाही. त्वचेवर केमिकलचा कमीत कमी प्रभाव व्हावा हाच करिश्माचा हेतू असतो.
2. नो मेकअप लूक
करिश्मा कपूरला नो मेकअप लूक फार आवडतो. जेव्हाही ती कधी शूट आणि पार्टीसाठी जाणार नसेल तेव्हा ती अजिबात मेकअप करत नाही. शक्य असेल तेव्हा ती आपल्या स्किनला मेकअप पासून लांब ठेवते.
3. सकाळचा नाश्ता
त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी करिश्माचं सर्वात महत्त्वाचं ब्युटी सीक्रेट म्हणजे, सकाळचा नाश्ता. करिश्मा सकाळचा नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करते. नाश्त्यामध्ये करिश्मा बेरीजचा समावेश करते. बेरिजमध्ये फायटो-न्यूट्रिएंट्स असतात. जे स्किन टिशूज डॅमेज होण्यापासून बचाव करतात.
4. बदामाचा जास्त वापर
त्वचा आणि केसांसाठी ती बदामाच्या तेलाचा वापर करते. तसेच दररोज डाएटमध्येही बदामाचं सेवन करते. बदामामध्ये असलेलं ओमेगा-2 त्वचा आणि केसांना नैसर्गिकरित्या सुंदर करण्यासाठी मदत करतात.
5. खूप पाणी पिते करिश्मा
करिश्माचय्या सौंदर्याचं आणखी एक गुपित म्हणजे, पाणी. करिश्मा दिवसभरात कमीत कमी 8 ते 9 ग्लास पाणी पिते. पाणी त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यासोबतच नॅचरल ग्लो वाढवण्यास मदत करतं.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.