दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:40 PM2019-03-04T16:40:46+5:302019-03-04T16:42:00+5:30
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते.
बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या घायळ करणाऱ्या सौंदर्याची बात काही औरच... या अभिनेत्रींच्या फॅशनपासून त्यांची स्टाइल कॉपी करण्याची अनेक तरूणींची धडपड असते. दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे बीटाउनच्या हॉट अभिनेत्रींप्रमाणे आपणही दिसावं अशी अनेक तरूणींची इच्छा असते. त्यासाठी त्या अनेक उपाय करत असतात. एवढचं नाही तर अनेकदा बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सचाही त्या वापर करत असतात. आज आम्ही तुमचं काम थोडंसं सोपं करणार आहोत आणि बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या ब्युटी सीक्रेट्सबाबत सांगणार आहोत.
ऐश्वर्या फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक. लग्न आणि त्यानंतर आई झाल्यानंतरही तिच्या सौंदर्यात कणभरही फरक जाणवतं नाही. ऐश्वर्या आपलं सौंदर्य आणखी बहरवण्यासाठी जास्तीतजास्त नॅचरल प्रोडक्ट्सचा वापर करते. ती दही, काकडी, बेसन यांसारख्या पदार्थापासून तयार करण्यात आलेल्या फेसपॅकचा वापर करते. त्याचबरोबर ती आठवड्यातून एकदा केसांना तेल लावून मालिशही करते.
दीपिका पादुकोण
दीपिकाचं सौंदर्य आणि फिटनेसवर अनेक तरूण-तरूणीचं नाही तर बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रीही पिदा आहेत. काही दिवसांपूर्वीच आलियाने दीपिकाची फिगर आणि तिच्या सौंदर्याची तारिफ केली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दीपिका आपल्या फ्लॉलेस स्किनसाठी जंक फूडपासून शक्य तेवढी लांबच राहते. त्याचबरोबर ती लिक्विड इंटेक मोठ्या प्रमाणावर घेते. यामुळे स्किन सॉफ्ट होण्यास मदत होते. या सर्व गोष्टींसोबतच ती एक्सरसाइजवरही लक्ष देते. जेव्हा केव्हा बीझी शेड्यूलमधून थोडा वेळ मिळेल तेव्हा ती स्पा घेण्यास अजिबात विसरत नाही. स्पामुळे स्किन पोर्स क्लिन होतात आणि स्किन मुलायम होते. दीपिका रात्री नाइट क्रिम आणि दिवसा SPF असलेल्या क्रिम्स वापरते.
करीना कपूर
करीना कपूरच्या तर जीन्समध्येच सौंदर्य आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. करिनाने प्रेग्नेंसीनंतर स्वतःला फिट ठेवलं असून तिने आपलं सौंदर्यही जपलं आहे. ती आपल्या केसांवर ऑलिव्ह ऑइल, बदामाचं तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावते. तसेच त्वचेसाठी ती मधाचा वापर करते. त्यामुळे त्वचा चमकदार दिसण्यासोबतच तजेलदार होण्यासही मदत होते.
कतरीना कैफ
कटरीना त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या कॉन्फिडेंससोबत नो-मेकअप लूक कॅरी करते. ती मेकअपशिवायही फार सुंदर दिसते. यासाठी ती चेहऱ्यावर आइलने मसाज करते. ज्यामुळे स्किन ग्लो होण्यासोबतच मुलायमही होते. त्याचबरोबर मेकअपमुळे होणारा ड्रायनस दूर करतं. केसांना कटरिना ड्रायरशिवाय म्हणजेच एअर ड्राय करणं पसंत करते.
प्रियंकाची गॉर्जियस स्किनवर तर हॉलिवूड अभिनेत्रीही फिदा आहेत. यासाठी प्रियंका चेहऱ्यावर दही आणि हळदीचा पॅक लावते. ज्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यासोबतच स्किनवरील अशुद्ध घटकही दूर करण्यासाठी मदत होते. प्रियंका आपल्या केसांना दररोज रात्री तेल लावते आणि सकाळी शॅम्पूने स्काल्प क्लिन करते. त्याचबरोबर ज्यादिवशी तिला शूटिंग नसतं त्यादिवशी ती मेकअपपासून लांब राहते.