BEAUTY : चेहऱ्यावरील ‘तीळ’ सांगे बरेचकाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2017 09:26 AM2017-03-18T09:26:11+5:302017-03-18T14:56:11+5:30

डाव्या डोळ्याखाली ज्या व्यक्तीला तीळ असतो, अशा लोकांचे वैवाहिक आयुष्य खूपच चांगले असते. अशा व्यक्तीचा पार्टनर त्याच्या या गुणामूळे खूपच आनंदी असतो.

BEAUTY: 'Sesame' on the face Many say! | BEAUTY : चेहऱ्यावरील ‘तीळ’ सांगे बरेचकाही !

BEAUTY : चेहऱ्यावरील ‘तीळ’ सांगे बरेचकाही !

Next
ong>-Ravindra More
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर जन्मत: काहीना काही निशाण असते. मग तो जन्मडाग असू शकतो किंवा एखादा डाग असू शकतो. ही निशाण जन्मापासून मृत्युपर्यंत त्या व्यक्तीच्यासोबतच असते. जन्मापासून मिळालेल्या या निशाणाऐवजी आपल्या शरीरावर अजून एक वस्तू असते, आणि ती आपल्या व्यक्तित्त्वावर खूपच प्रभाव पाडते आणि आपल्याबाबत खूपच गुढदेखील उलगडते, ज्याला आपण ‘तीळ’ नावाने ओळखतो. शरीरावरील हा लहानसा काळा डाग सर्वांच्या शरीरावर कुठेना कुठे आहेच आणि हा काळा डाग शरीरावर विनाकारण नसतोच. मनुष्याच्या शरीरावर असणारा हा तीळ प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तित्त्वाच्या बाबतीत नक्कीच काहीतरी सांगत असतो. चला मग जाणून घेऊया की, चेहऱ्यावर आढळणारा तीळ काय सांगतो आपल्याबाबत... 

असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीच्या भुवयांच्या मधोमध तीळ असेल तर तो व्यक्ती बुद्धिमान समजला जातो. अशा लोकांची स्मरणशक्ती खूप मजबूत असते आणि असे व्यक्ति आपल्या कौशल्याच्या जोरावर यश आणि धनसंपत्ती मिळवू शकतात.  

ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याखाली तीळ असतो, असे लोक खूप भावनिक असतात. सोबतच यांच्या मनात ईर्षाची भावनाही त्वरित निर्माण होते. कारण असे लोक ज्याच्याकडून पराजित होतात, त्यांनो आपला शत्रू मानतात. 

ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो, असे लोक बौद्धिक स्तरावर इतरांपेक्षा खूपच पुढे असतात. 

ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याजवळ नाकाच्या खाली तीळ असतो, असे व्यक्ति स्वभावाने खूपच गुढ असतात. त्यांना ओळखणे एवढे सोपे नसते. 

ज्या व्यक्तीच्या नाकाच्या अग्रस्थानी तीळ असतो, असे लोक खूपच रचनात्मक असतात आणि विशेष म्हणजे असे लोक आपले करिअर क्रिएटिव्ह क्षेत्रातच बनवितात. 

ज्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो, ते व्यक्ती स्वभावाने खूपच आत्मकेंद्रित असतात. आणि हाच स्वभाव त्यांच्यासाठी कधी कधी घातकही ठरतो. 

डाव्या डोळ्याखाली ज्या व्यक्तीला तीळ असतो, अशा लोकांचे वैवाहिक आयुष्य खूपच चांगले असते. अशा व्यक्तिचा पार्टनर त्याच्या या गुणामूळे खूपच आनंदी असतो. 

Web Title: BEAUTY: 'Sesame' on the face Many say!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.