Beauty : ​चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी "या" आहेत खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 09:39 AM2017-06-07T09:39:14+5:302017-06-07T15:09:14+5:30

वजन वाढल्याने चेहऱ्यावरदेखील अतिरिक्त चरबी जमा होते, यामुळे आपला चेहऱ्याचा ढब बिघडून सौंदर्यात बाधा निर्माण होतो.

Beauty: There are "these" special tips to reduce the extra fat on the face! | Beauty : ​चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी "या" आहेत खास टिप्स !

Beauty : ​चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी "या" आहेत खास टिप्स !

Next
वजन वाढण्याची समस्या बहुतांश लोकांना सतावत आहे. वजन वाढल्याने चेहऱ्यावरदेखील अतिरिक्त चरबी जमा होते, यामुळे आपला चेहऱ्याचा ढब बिघडून सौंदर्यात बाधा निर्माण होतो. आपणासही ही समस्या असेल तर आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्याद्वारे आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. 

* आपली मान मागच्या बाजूला झुकवा आणि आकाशाकडे पाहा. आता जीभेला जेवढे शक्य आहे तेवढे तोंडाबाहेर काढा. या पोजिशनमध्ये किमान १० सेकंद राहा. असे १० वेळा करा.

* मानेला अगदी सरळ ठेवा. त्यानंतर तोंडाबाहेर जीभ बाहेर काढून किमान १० सेकंद त्याच पोजिशनमध्ये राहा. असे १० वेळा करा. 

* मानेला सरळ ठेवा. आता ओठांना गोल करुन टाइट करा. गालांना आत करण्याचा प्रयत्न करा. अशा पोजिशनमध्ये किमान १० सेकंदापर्यंत राहा. असे १० वेळा करा. 

* मान मागच्या बाजूला करुन आकाशाकडे पाहा. आता ओठांना गोल करुन टाइट करा. असे १० सेकंदापर्यंत करा. 

*  दोन्ही गाल आणि ओठांना तोंडाच्या आत ओढण्याचा प्रयत्न करा. असे ५ सेकंदापर्यंत करा. 

हे व्यायाम केल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. 

Also Read : Beauty : चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!

Web Title: Beauty: There are "these" special tips to reduce the extra fat on the face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.