Beauty : सुंदर ओठांसाठी हे आहेत घरगुती प्रभावी उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 12:54 PM2017-07-20T12:54:40+5:302018-06-23T12:04:14+5:30
ओठांची त्वचा आरोग्यपूर्ण राहावी यासाठी काही घरगुती उपाय सुचविले आहेत.
Next
शूटिंगसाठी अभिनेत्रींना नेहमी बाहेर राहावे लागते. वातावरणाचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होऊ नये म्हणून त्यांना नेहमी काळजी घ्यावी लागते. विशेषत: चेहऱ्याचे सौंदर्य ओठांवर अवलंबून असते आणि ओठांची त्वचा संवेदनशील असल्याने हवामानाचा ओठांवर लवकर प्रभाव दिसून येतो. यासाठी ओठांची त्वचा आरोग्यपूर्ण राहावी यासाठी खालील उपाय सुचविले आहेत.
* ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस ओठांवर लावा. यामुळे काळसरपणा तर दूर होईल शिवाय ओठांचा ओलावाही वाढण्यास मदत होईल.
* लिपस्टिकच्या अती वापरामुळे ओठांचे नुकसान होते. यासाठी बीटरूटचा एक तुकडा, मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवा. यामुळे ओठांचे आरोग्य टिकून सौंदर्यही वाढण्यास मदत होईल.
* चमकदार ओठ हवे असल्यास रोज रात्री नारळाचे तेल ओठांवर लावा.
* वातावरणाच्या परिणामाने ओठांवर डेड स्कीन निर्माण होते. यासाठी मध आणि साखरेची बारीक पूड मिक्स करून या मिश्रणाने ओठांना हळुवार मसाज करा. यामुळे ओठांवरील डेड स्कीन निघून जाईल.
* मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ग्लिसरीन आणि दह्याचे मिश्रण ओठांवर लावा. शिवाय ओठांवर पुदिन्याच्या पानांचा रस १५ मिनिटे लावून नंतर गार पाण्याने धुतल्यासही ओठ गुलाबी होण्यास मदत होते.
* ओठ कोरडे पडत असतील तर ई जीवनसत्त्व आणि बीवॅक्सयुक्त लिप बामने ओठांवर सतत मसाज करत रहा. यामुळे ओठ कोरडे पडणार नाहीत. ओठांचा ओलावा दिवसभर टिकून राहायला हवा. लिप बामऐवजी तुमचे नेहमीचे मॉइश्चरायझिंग क्रीमही लावू शकता.
* ओठांच्या सौंदर्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्यापेक्षा वर दिलेले घरगुती उपाय केल्यास ओठांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त होईल.