Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 11:14 AM2017-08-29T11:14:03+5:302018-06-23T12:03:56+5:30

केसांना तेल लावण्यासोबतच इतर काही उपाय आहेत जे तुमचे केस दाट व निरोगी ठेवण्यास मदत करतील.

Beauty: "These" are for easy and durable hair! | Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !

Beauty : ​दाट व मजबूत केसांसाठी "हे" आहेत अगदी सोपे उपाय !

Next
े रेशमी झुल्फे, ये शरबरी आँखे, इन्हे देखकर जी रहे है सभी...’ हे गाणे ऐकून एखाद्या महिलेला आपलेही केस असे रेशमी असायला हवेत, असे वाटत असेल. रेशीम सारखे केस होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते निरोगी असायला हवेत आणि निरोगी केसांचे वैशिष्टे म्हणजे ते दाट आणि मजबूत असतात. मात्र सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम केसांवरही जाणवायला लागला असल्याने अकाली पांढरे होणे, केस गळणे, ड्राय होणे आदी समस्या उद्भवायला लागल्या आहेत. या समस्या दूर होण्यासाठी म्हणजेच केसांना दाट व निरोगी ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो. आज आम्ही आपणास अशाच प्रभावशाली उपायांबाबत सांगत आहोत. 
केसांना तेल लावण्यासोबतच इतर काही उपाय आहेत जे तुमचे केस दाट व निरोगी ठेवण्यास मदत करतील.

* गाजर 
दोन चमचे गाजराचा रस नियमितपणे केसांना लावा. एक तासाने केस धुवून घ्या.

* आंबट दही
दोन चमचे कांद्याच्या रसात एक चमचा दही व लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. 

* मेथी दाणे 
दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या दाण्यांची पेस्ट बनवून केसांना लावा. 

* कढीपत्ता
एक चमचा कढीपत्ता व एक चमचा दह्याची पेस्ट बनवा. याला केस व स्काल्पवर लावून ठेवा. काही वेळाने केस धुवा. 

* लिंबू
दोन लिंबांचा रस नियमितपणे केसांना लावून मसाज करा. यामुळे कोंडा कमी होईल. 

* अ‍ॅलोवेरा जेल
 कोरफडीचा गर म्हणजेच अ‍ॅलोवेरा जेल केसांना लावा. एक तासाने केस धुवा. यामुळे कोंडा व केस गळणे थांबेल. 

Also Read : HEALTH : केस ​पांढरे होण्याची ‘ही’ आहेत कारणे !
                  : Beauty : केस गळती आणि पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा आहे खास पॅक !

 

Web Title: Beauty: "These" are for easy and durable hair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.