Beauty : ​‘या’ वस्तूंचा वापर सौंदर्यासाठी घातकच !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 12:43 PM2017-06-06T12:43:17+5:302017-06-06T18:14:05+5:30

सौंदर्य खुलविण्यासाठी ज्याप्रमाणे काही पदार्थ खाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही पदार्थ वर्ज्य करणेही आवश्यक आहे.

Beauty: 'These things are dangerous for beauty!' | Beauty : ​‘या’ वस्तूंचा वापर सौंदर्यासाठी घातकच !

Beauty : ​‘या’ वस्तूंचा वापर सौंदर्यासाठी घातकच !

Next
ong>-Ravindra More
आज प्रत्येकाला वाटते की, आपण सुंदर दिसावे. त्यासाठी विशेष काळजीदेखील घेतली जाते. मात्र बरेच प्रयत्न करुनही कित्येकांचे सौंदर्य अपेक्षित खुलत नाही. एका अभ्यासानुसार आहाराचा परिणाम आपल्या सौंदर्यावर होत असतो. म्हणजेच आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. काही पदार्थांच्या सेवनाने सौंदर्य खुलण्यास मदत होते तर काही पदार्थांमुळे सौंदर्य धोक्यात येऊ शकते, ज्याप्रमाणे काही पदार्थ खाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही पदार्थ वर्ज्य करणेही आवश्यक आहे. आज जाणून घेऊया की, कोणते पदार्थ सौंदर्याला बाधा ठरतात ते. 

* कॉफीचे सेवन
बहुतांश जणांना कॉफी सेवन करण्याची सवय आहे. मात्र कॉफिच्या अतिसेवनाचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. कॅफिन या उत्तेजक द्रव्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि त्वचेचा ताजेपणा निघून जातो. त्यामुळे त्वचा निस्तेच आणि कोरडी दिसू लागते. शिवाय दिवसभर कॉफी घेतल्याने डोकेदुखी, पित्ताचा त्रास होऊ शकतो. 

* मसाल्याचे पदार्थ
बऱ्याचजणांना मसाल्याचे पदार्थ युक्त भाजी खाण्याची सवय असते. मसाल्याच्या मिश्रणात दालचिनी असते. त्यातच मिरची पावडर आणि काळी मिरीची पावडर असते. या झणझणीत मसाल्याचा परिणाम आपल्या त्वचेची चमक आणि गुळगुळीतपणा कमी होऊ लागतो. शिवाय त्वचा सैलदेखील होते. 

* मीठ 
जास्त मीठ शरीरासाठी अपायकारकच म्हटले आहे. जास्त मिठाच्या सेवनाने ह्रदयाच्या समस्या निर्माण होतात तसेच रक्तदाबही वाढतो.  शिवाय मीठ त्वचेमधील कोलेजीन कमकुवत करते आणि त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात.
 
* साखर
अतिरिक्त साखरेच्या सेवनाने इन्शुलिनवरील ताण वाढतो. यामुळे म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसतात.

Also Read : ​Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !
                   ​Beauty : ​चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी..!

Web Title: Beauty: 'These things are dangerous for beauty!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.