BEAUTY TIPS : मुरूम फोेडल्यानंतर चेहऱ्यावर डाग पडले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2017 10:49 AM2017-03-23T10:49:09+5:302017-03-23T16:19:09+5:30
चेहऱ्यावरील मुरूम असह्य झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय.
Next
ब ्याचदा आपल्या चेहऱ्यावरील मुरूम असह्य झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय.
* चेहऱ्यावर मुरूम झाले की, त्याठिकाणी लालसरपणा आणि सूज येते. अशावेळी सर्वप्रथम त्या जागेवर काही गार अर्थात बर्फ लावा. ज्याने रक्त थांबेल आणि सूजही कमी होईल. मात्र आईस बॅग त्या जागेवर २० मिनिटाहून अधिक वेळेपर्यंत ठेऊ नका.
* आता बेंजोयल पेरोक्साइड लावा. मुरूम फोडल्यावर त्यातील पस आतील बाजूला शिरू शकत आणि बेंजोयल पेरोक्साइड त्या जागेवरील बॅक्टिरिया कमी करेल आणि सूजही कमी होईल ज्याने डाग पडण्याची शक्यता कमी होईल.
* डाग पडू नये म्हणून त्या जागेवर स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन टाकावे. कारण हातात असलेले बॅक्टिरिया त्या जागेवर जाऊन संक्रमण पसरवू शकतात.
* मुरूम आल्यानंतर अशाठिकाणी खाज सुटते, मात्र तिथे खाजवू नका. अशाने सूज तर वाढेल शिवाय डाग पडण्याची शक्यताही वाढते.