​Beauty Tips : सेलिब्रिटींसारखा सुंदर, तेजस्वी चेहरा हवा आहे, करा हे सोपे व्यायाम !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 06:44 AM2017-08-24T06:44:10+5:302018-06-23T12:04:00+5:30

जसे आपण आपले शरीर फिट राहण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो, तसा चेहऱ्याच्याही व्यायाम केल्याने चेहरा तेजस्वी राहतो, जाणून घ्या त्या व्यायाम प्रकारांबाबत...!

Beauty Tips: A beautiful, bright face, like celebrity, is an easy exercise! | ​Beauty Tips : सेलिब्रिटींसारखा सुंदर, तेजस्वी चेहरा हवा आहे, करा हे सोपे व्यायाम !

​Beauty Tips : सेलिब्रिटींसारखा सुंदर, तेजस्वी चेहरा हवा आहे, करा हे सोपे व्यायाम !

googlenewsNext
ong>-रवींद्र मोरे 
आपलाही चेहरा सेलिब्रिटींसारखा सुंदर, तेजस्वी दिसावा असे बऱ्याचजणांना वाटते. चेहऱ्याचे सौंदर्य टिकविण्यासाठी सेलेब्स तसा प्रयत्नही करतात. संतुलित आहाराबरोबरच ते जिम, योगाचाही आधार घेतात. 
आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आपला चेहरा असतो. चेहऱ्यावरील तेज आपल्या सुदृढ आरोग्याचे प्रतिक समजले जाते. जसे आपण आपले शरीर फिट राहण्यासाठी शरीराचा व्यायाम करतो, तसा चेहऱ्याच्याही व्यायाम केल्याने चेहरा तेजस्वी राहतो, असे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. म्हणजे शरीराबरोबरच चेहऱ्यालाही व्यायामाची आवश्यकता असते. चेहरा निरोगी आणि तेजस्वी राहण्यासाठी काही व्यायाम प्रकार असून आज आम्ही आपणास त्याविषयी सांगणार आहोत.  

चेहऱ्याचा व्यायाम करण्यासाठी आपण इंग्रजीच्या स्वरांचा वापर करुन शकता. यासाठी  ए, ई, आय, ओ, यू हे स्वर मोठ्याने, तोंड पूर्णपणे उघडून म्हणायचे आहेत. यामुळे आपल्या चेहऱ्याचा व्यायाम होण्यास मदत होईल. 

तसेच चेहऱ्याच्या सौंदर्यामध्ये डोळ्यांचीही भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून डोळ्यांना नेहमी आकर्षक ठेवण्यासाठी आपल्या हाताचा अंगठा डोळ्यांच्या किनारीवरुन नाकाकडून कानाकडे फिरवा. यानंतर असेच उलट फिरवा. यामुळे तुमच्या डोळ्यांवर तेज येऊन ते सुंदर दिसण्यास मदत होईल.  
गालावर सुरकुत्या दिसू लागल्यास आपले सौंदर्य खालावते. यासाठी सुरकुत्या येऊ नयेत म्हणून सरळ बसून तोंडात हवा भरावी. यामुळे गाल गोबरे दिसतील. यानंतर २० सेकंदाने हावा सोडून द्या. असे रोज १० वेळा करा.

तसेच डोळ्यांभोवतालच्या भागाचाही व्यायाम व्हावा म्हणून यासाठी आपल्या आयब्रोला शक्य तेवढे डोळ्यांच्या दिशेने ओढा आणि एक मिनिटाने सैल सोडा. असे दिवसातून तीन ते पाच वेळा करा. 

या व्यायाम प्रकाराने चेहऱ्याची परिपूर्ण हालचाल होऊन चेहऱ्याच्या त्वचेतील पेशी अ‍ॅक्टिव होतात, ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहते आणि यामुळे चेहरा तेजस्वी दिसण्यास मदत होतो.  

Also Read : ​Beauty & Fitness : ​सौंदर्य आणि सुदृढ आरोग्यासाठी हे आहेत खास घरगुती उपाय !
                   : ​Beauty : ​चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर !

Web Title: Beauty Tips: A beautiful, bright face, like celebrity, is an easy exercise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.