Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 11:03 AM2017-05-25T11:03:06+5:302017-05-25T16:33:06+5:30

त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बरेचजण विविध आणि महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतात. यांचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होताना दिसते. आज आपण गुलाब तेलाच्या उपयोगांबाबत जाणून घेऊया.

Beauty Tips: 'Gulab Oil' is effective for skin health! | Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !

Beauty Tips : ​त्वचेच्या आरोग्यासाठी ‘गुलाब तेल’ गुणकारी !

googlenewsNext
ल्या त्वचेच्या आरोग्यासाठी आपले सौंदर्य अवलंबुन असते. त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी बरेचजण काहीना काही प्रयत्न करताना दिसतात. विविध आणि महागडे सौंदर्य प्रसाधने वापरतात. यांचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होताना दिसते. आज आपण गुलाब तेलाच्या उपयोगांबाबत जाणून घेऊया.
 
गुलाबाच्या तेलात अँटी व्हायरल अवसादरोधी, अँटीसेप्टिक आणि अँस्ट्रिंजेंट गुण आढळतात. त्यामुळे त्वचेसंदर्भात अनेक तक्रारींवर गुलाबतेल गुणकारी आहे. 
 
* रुक्ष त्वचेवर उपयोगी
अनेक लोकांच्या डोळ्याखाली त्वचा रुक्ष असते. त्यावर गुलाबाचे तेल फायदेशीर ठरतं. याने कोरडेपणा दूर होऊन त्वचा नरम पडते. 

* त्वचेची स्वच्छता
गुलाबाच्या तेलात अँटीआॅक्सीडेंट गुण आढळतात जे त्वचेहून फ्री रॅडिकल हटवतात. याने रोम छिद्रात घाण जमत नाही आणि त्वचा स्वच्छ राहण्यात मदत मिळते.

* पिंपलवर प्रभावी
गुलाबाच्या तेलाने पीपलास नाहीसे होतात आणि त्वचा डागरहित होते. यात अँटीव्हायरस आणि प्रतिजैविक गुण असल्यामुळे डाग आणि पिंपल होण्यापासून मुक्ती मिळते.
 
* वय कमी दिसत
 गुलाबाच्या तेलाने रुक्ष, बेजना आणि सुरकुत्या पडलेल्या त्वचेवर लाभ होतो. गुलाबाच्या तेलाने मालीश केल्यावर वय कमी दिसू लागतं. याने चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या नाहीश्या होतात.

* मॉइश्चराइज करण्यात मदत
 गुलाबाचं तेल त्वचेचा पीएच स्तर नियमित करतं त्यामुळे नैसर्गिकरीत्या त्वचेला नमी मिळते. आपण यासाठी नियमित क्रीममध्ये तेल मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.
 
* छिद्र लहान करत
यात अँस्ट्रिंजेंट गुण असल्याने हे चेहऱ्यावरील खोल झालेले छिद्र लहान करण्यात मदत करतं. ३० हून अधिक वय झाल्यावर गुलाब जलदेखील फायदेशीर ठरतं. याने पिंपल्स होण्याची शक्यताही कमी होते.          

* हायड्रेटिंग बेस रूपात
त्वचेला हायड्रेंट करण्यासाठी गुलाबाच्या तेलात जरा पाणी मिसळून घ्या. हे फाउंडेशन लावण्यापूर्वी लावा. याने चेहऱ्यावर बेस बनण्यात मदत मिळते. जोपर्यंत चेहरा तेल शोषून घेत नाही तोपर्यंत तेलाची मालीश करणे आवश्यक आहे.
  
* त्वचेची सूज कमी होते
गुलाबाच्या तेलात सूज कमी करणारे अँटीव्हायरस गुण असतात जे जळजळ आणि सुजेत फायदेशीर ठरतात. गुलाबाच्या तेलाचे काही थेंब जळजळत असलेल्या भागावर लावल्याने फायदा होतो. जळजळ कमी करण्यासाठी गुलाबाच्या तेलात नारळाचे तेल मिसळावे आणि या तेलाने जळत असलेल्या भांगेवर हलकी मालीश करावी. 

Also Read : ​सर्व त्वचा विकारांवर ‘लवंग तेल’ आहे गुणकारी !

Web Title: Beauty Tips: 'Gulab Oil' is effective for skin health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.