हेअर व्हॅक्सिंग किंवा ट्रिमिंग पुरुषांसाठी काय योग्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2018 11:50 AM2018-07-03T11:50:43+5:302018-07-03T11:52:01+5:30

पुरुष आजकाल स्वत:बाबत फारच कॉन्शिअस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातही हा ट्रेन्ड वाढतो आहे. पण त्यांच्यासाठी व्हॅस्किंग योग्य आहे की, बॉडी शेव्हिंग किंवा त्यांनी हेअर ट्रिमिंग करावं का? हे जाणून घेऊ...

Beauty Tips : Hair waxing or body shaving or trimming for men | हेअर व्हॅक्सिंग किंवा ट्रिमिंग पुरुषांसाठी काय योग्य?

हेअर व्हॅक्सिंग किंवा ट्रिमिंग पुरुषांसाठी काय योग्य?

आजच्या लाइफस्टाइलमध्ये बॉडी ग्रुमिंग(शरीरावरील केस काढणे) करणे केवळ महिलांपुरतचं मर्यादित राहिलेलं नाहीये. आपला चेहरा आणि बॉडी मेन्टेन ठेवण्यासाठी पुरुषही ग्रुमिंग सर्व्हिस घेतात. स्टाइलिश हेअर कट, आयब्रोज, दाढीचे वेगवेगळे लूक ट्राय करणे हे आता पुरुषही ट्राय करु लागले आहेत. पुरुष आजकाल स्वत:बाबत फारच कॉन्शिअस झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यातही हा ट्रेन्ड वाढतो आहे. पण त्यांच्यासाठी व्हॅस्किंग योग्य आहे की, बॉडी शेव्हिंग किंवा त्यांनी हेअर ट्रिमिंग करावं का? हे जाणून घेऊ...

व्हॅस्किंगमुळे होणारा त्रास

अर्थातच पुरुष आणि महिलांच्या स्कीनमध्ये फरक असतो. महिलांची स्कीन पुरुषांच्या तुलनेक जास्त सॉफ्ट आणि लवचिक असते. त्याच प्रमाणे पुरुष आणि महिलांच्या केसांमध्येही फरक असतो. महिलांचे केस जास्त सॉफ्ट असतात तर पुरुषांचे केस हार्ड असतात. त्यामुळेच व्हॅक्सिंग करताना  महिलांचे केस सहज काढले जातात. मात्र व्हॅक्सिंगने होणाऱ्या वेदना फार जास्त होतात. पण जर  बॉडी शेव्हिंग केलं तर त्याने केस आणखी हार्ड होतात. त्यामुळे ते पूर्णपणे निघू शकत नाहीत. तप व्हॅक्सिंगने केस पूर्णपणे निघतात. ट्रिमिंगबाबत सांगायचं तर याने केसही दूर करता येतात आणि वेदनाही होत नाही. 

व्हॅक्सिंगची रिस्क

व्हॅक्सिंग प्रत्येकाच्याच स्कीनला सूट होत नाही. अनेकदा व्हॅक्सिंग केल्याने बॉडीवर फुऱ्या होतात. व्हॅस्किंगच्या उष्णतेने काळे डागही पडतात. त्यासोबतच शेव्हिंगमुळेही वेगवेगळे स्कीन इन्फेक्शन होतात. पण ट्रिंमिंग केल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. कारण याने केस मुळासगट निघत नाहीत आणि केस काढण्यासाठी कोणतीही वस्तू स्कीनवर लावली जात नाही. केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरणाने ट्रिम केलं जातं. 

स्कीन डॅमेड होत नाही

गरम व्हॅक्समुळे अनेकदा स्कीनच्या महत्वपूर्ण कोशिका डॅमेज होतात. शेव्हिंग क्रिम सूट न झाल्यास याचाही स्कीनवर प्रभाव पडतो. पण बॉडी हेअर ट्रिम करताना स्कीनच्या वरच्या त्वचेवर कोणताही प्रभाव पडत नाहीय त्यामुळे ट्रिमिंग एक चांगला पर्याय मानला जातो. 

जखम झाल्यास

बॉडीवर कुठेही जखम झाल्यास ना तुम्ही शेव्ह करु शकत ना तुम्ही व्हॅक्सिंग करु शकत. पण या शरीराच्या त्या भागावरील केस तुम्ही हळुवारपणे ट्रिम करु शकता. याने झालेल्या जखमेवर कोणताही प्रभाव पडत नाही आणि केसही काढले जातात.
 

Web Title: Beauty Tips : Hair waxing or body shaving or trimming for men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.