BEAUTY TIPS : सतेज त्वचेसाठी करा घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2017 08:07 AM2017-04-12T08:07:17+5:302017-04-12T13:37:17+5:30
आपल्या शरीरावर डाग आणि स्ट्रेच मार्क आहेत? करा हे घरगुती उपाय !
सुंदर आणि दिसण्यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न करीत असते. त्यासाठी ती आपल्या शरीरावर एकही डाग दिसू नये म्हणून काळजी घेत असते. मात्र बरेच प्रयत्न करुनही विविध कारणांनी डाग किंवा शरीरावर स्ट्रेच मार्क्स पडतात आणि ते जाता जात नाहीत. यावर मात्र घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्यास नक्कीच फरक पडेल.
काय कराल घरगुती उपाय ?
* लिंबाचा रस शरीरावरील स्ट्रेच मार्क्सवर दहा मिनिटापर्यंत लावून ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. यामुळे स्ट्रेच मार्क्सपासून सुटका होईल.
* त्वचा निरोगी राहण्यासाठी विटामिन सी आणि ई फार गरजेच असतं. पालक, गाजर, फरसबी, हिरव्या भाज्या, स्ट्रॉबेरी, बदाम यासारखं हेल्दी फुड नेहमीच्या जेवणात असेल तर त्वचा सतेज राहते.
* दिवसातून रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीरावरील डाग आणि स्ट्रेच मार्क्स कमी होण्यास मदत होऊ शकते.
* एलोवेरा जेलने शरीरावरील स्ट्रेच मार्क्सवर मसाज केल्याने त्वचा उजळते. तसंच खराब त्वचा नष्ट होते.
* नियमित व्यायाम शरीरासाठी फायदेशीर असतो. सततच्या व्यायामामुळे शरीरावरील निशाण हळूहळू कमी होतात.