मजबूत, दाट आणि कोंडा नसलेले केस मिळवण्यासाठी मेथीचा 'असा' करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 12:04 PM2018-08-08T12:04:11+5:302018-08-08T12:04:46+5:30
अनेकांना हे माहीतच नसतं की, या महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपायांनीही ही समस्या दूर केली जाऊ शकेत.
(Image Credit : The Health Site)
बदलत्या खाण्या-पिण्यांच्या सवयीमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात खासकरुन अनेकांना केसगळतीची मोठ्या समस्या आहे. त्यामुळे यावर उपाय करण्यासाठी अनेक महागड्या उत्पादनांचा वापर काहीजण करतात. पण अनेकांना हे माहीतच नसतं की, या महागड्या उत्पादनांवर पैसे खर्च करण्यापेक्षा काही घरगुती उपायांनीही ही समस्या दूर केली जाऊ शकेत. भारतीय खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मेथीच्या मदतीने केसांबाबतची समस्या सोडवली जाऊ शकते. चला जाणून घेऊ कसा करावा मेथीचा वापर.
मजबूत-दाट केसांसाठी
केस जर मुळात मजबूत नसले तर केसगळतीची समस्या उद्भवते. केसांना मजबूत करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. मेथीचे दाणे चांगल्याप्रकारे बारीक करुन पावडर तयार करा आणि खोबऱ्याच्या तेल त्यात टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांना लावा आणि काही वेळासाठी ते तसंच ठेवा. काही वेळाने केस धुवून घ्या.
केसगळती रोखण्यासाठी
मेथीच्या दाण्यांच्या सेवनाने केसगळती रोखली जाऊ शकते. मेथीमध्ये प्रोटीन, लेसीथीनरी आणि निकोटिनिक अॅसिड आढळतं जे केसांना मजबूती देतं. केसगळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे रात्री पाण्यात भीजू घाला आणि सकाळी त्या पाण्याने केस धुवा. केस कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.
डॅड्रफची समस्या करा दूर
डॅड्रफची समस्या केसांसाठी फार घातक असते. डॅंड्रफमुळे केस आणखी कमजोर होतात. डॅड्रफच्या समस्येवर मेथीच्या दाण्यांनी लगेच सुटका मिळवली जाऊ शकते. रात्री मेथीचे दाणे भीजू घाला आणि सकाळी त्या दाण्यांची पेस्ट तयार करा, ही पेस्ट दह्यामध्ये मिश्रित करुन केसांवर लावा. नंतर केस धुवून घ्या.
केसांना चमकदार करण्यासाठी
केसांना चमकदार करण्यासाठी मेथीचे दाणे फार फायदेशीर असतात. मेथीच्या दाण्यांची पावडर तयार करुन त्यात नारळाचं दूध टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट केसांवर लावून काही वेळासाठी तसेच ठेवा. पेस्ट जेव्हा चांगल्याप्रकारे कोरडी होईल तेव्हा केस शॅम्पूने धुवा.
कंडीशनिंगमध्ये करा वापर
केसांना कंडीशनिंग तितकंच गरजेचं आहे जितकं केसांना साफ ठेवणं. कंडीशनिंगने केस मुलायम आणि चमकदार होता. मेथीचे दाणे कंडीशनरमध्ये मिश्रित करण्यासाठी मेथीचे दाणे रात्री भीजू घाला आणि सकाळी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांमध्ये लावा आणि केस धुवा. याने केस आणखी चमकदार होतील.