हेअर ट्रान्सप्लांट करणे बरोबर की चुकीचे? जाणून घ्या खास गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 12:02 PM2018-07-28T12:02:00+5:302018-07-28T12:02:22+5:30
केसगळतीची समस्या ही आज फार गंभीर समस्या झाली आहे. बदलत्या लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याचा सवयींमुळे हे सगळं होत आहे. त्यामुळे अनेकांचं कमी वयातच टक्कल पडतं.
केसगळतीची समस्या ही आज फार गंभीर समस्या झाली आहे. बदलत्या लाइफस्टाइल आणि खाण्या-पिण्याचा सवयींमुळे हे सगळं होत आहे. त्यामुळे अनेकांचं कमी वयातच टक्कल पडतं. अशात काही लोक पुन्हा केस यावेत म्हणून वेगवेगळे पर्याय शोधत असतात. त्यातील एक पर्याय म्हणजे हेअर ट्रान्सप्लांच. अलिकडे हे फारच लोकप्रिय होत आहे.
आज मेडिकल सायन्सच्या वाढत्या यशामुळे हेअर ट्रान्सप्लांट करणे फारच सोपे झाले आहे. ही सर्जरी आता भारतातही होऊ लागली आहे. पण प्रश्न हा आहे की, हेअर ट्रान्सप्लांटसाठी काय केलं पाहिजे? त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी लक्षात ठेवायला हव्यात. चला जाणून काही खास गोष्टी...
कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?
1) जर तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही ते कुठे करवून घेताय याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. म्हणजे त्या क्लीनिकची गुणवत्ता आणि जागा याची काळजी घ्या. कोणतीही भडक जाहिरात पाहून आणि कशाचीही माहिती न घेता असे काही करणे महागात पडू शकते.
2) हेअर ट्रान्सप्लांटआधी त्या डॉक्टरची माहिती घ्या. तो त्यातील तज्ज्ञ आहे की, जनरल डॉक्टर आहे हे तपासा. हेअर ट्रान्सप्लांट करणे हे पुन्हा पुन्हा शक्य होत नाही आणि त्यासाठी खर्चही खूप लागतो. त्यामुळे काहीही करताना आधी सर्व माहिती घ्यावी.
3) हेअर ट्रान्सप्लांट करण्याआधी त्याच्या तंत्रांचीही माहिती तुम्हाला असायला हवी. कोणत्या टेक्निकचा वापर केला जाणर आहे हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. कारण हेअर ट्रान्सप्लांट करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात.
काय करावे, काय करु नये?
1) सर्जरी करण्याआधी तुम्हाला सकाळी आणि सांयकाळी दोनदा केस धुवायला हवेत. सर्जरी करण्याआधी हेअर स्पाची प्रक्रिया करु नये.
2) जर तुम्हाला मधुमेह असेल तर डॉक्टरांना आधी त्याची माहिती द्यावी. त्यानुसार औषधे घ्यावीत.
3) हेअर ट्रान्सप्लांटच्या एक आठवड्यापूर्वी एस्पीरिन किंवा अॅंटीबायोटिक तसेच कोणतेही जड औषध घेता येणार नाही. पण एखाद्या गंभीर आजाराचा उपचार सुरु असेल तर याबाबत डॉक्टरांशी बोलायला हवे.
4) सर्जरीच्या एक आठवड्यापूर्वी अल्कोहोल, धुम्रपान आणि व्हिटॅमिन ए, बी इत्यादीही घ्यायला नकोत.
5) सर्जरीच्या काही दिवसांपूर्वी केसांना कलरही करु नये किंवा केसही कापू नयेत.