कोरोनाकाळात केसांचं गळणं कसं रोखाल?; मलायकानं सांगितला सोपा घरगुती फंडा, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 05:09 PM2020-10-12T17:09:58+5:302020-10-12T17:13:15+5:30
Beauty Tips Marathi : अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर केस गळण्यासंबंधीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
महिला असो किंवा पुरूष एका विशिष्ट वयानंतर केस गळण्याची समस्या सगळ्यांनाच उद्भवते. अनेकदा कमी वयातच ताण तणाव, खाणं पिणं व्यवस्थित नसणे, रोज पुरेशी झोप न होणं, हार्मोनल बदल यांमुळे केस गळण्याच्या समस्येचा सामना अनेकांना करावा लागतो. अभिनेत्री मलायका अरोराने सोशल मीडियावर केस गळण्यासंबंधीत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा आपला फिटनेस आणि दिलखेच अदांमुळे नेहमीत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मलायकाने कोरोनावर मात केली. कोरोना झाल्यानंतर फक्त फिटनेसच नाही तर केसांवर परिणाम परिणाम होऊन केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागला होता, म्हणूनच मलायका अरोराने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून केस गळणं कसं थांबवता येईल यासाठी मलायका लोकांना आवाहन करत आहे.
या व्हिडीओमध्ये केस गळणं थांबवण्यासाठी मलायका कोणते उपाय करते याबाबत माहिती दिली आहे. कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळण्यापासून सुटका मिळू शकते, हा उपाय स्वतः मलायका करताना दिसून येत आहे. एक कांदा घेऊन सगळ्यात आधी त्याचा रस तयार करते. त्यानंतर कापसाच्या साहाय्याने केसांच्या मुळांना हा रस लावत आहे. आयब्रोचे पातळ केस दाट करण्यासाठी केलं जातं 'मायक्रो ब्लेडींग'; 'अशी' असते सोपी ट्रिटमेंट
मलायकाने सांगितले की, सध्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिटामिन्सच्या सप्लिमेंट्स घेत आहे. पण हा एक असा उपाय आहे. जो उपाय मलायका अनेक वर्षांपासून फॉलो करत आहे. कोरोनातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर आता इंडियाज् बेस्ट डान्सरच्या सेटवर जायला सुरूवात केली आहे. या सेटवर मलायकाचे जबरदस्त स्वागत करण्यात आले होते. चांगल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रभावी ठरतं 'ड्राय ब्रशिंग'; कमी खर्चात त्वचेला 'असा' होतो फायदा