Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2017 08:16 AM2017-04-07T08:16:30+5:302017-04-07T13:46:30+5:30

अशा काही खास टिप्स आहेत, ज्या फॉलो केल्यास आपण स्मार्ट दिसण्यास मदत होईल.

Beauty Tips: Men, Smart Art? Use the home special tips! | Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स !

Beauty Tips : पुरुषांनो, स्मार्ट दिसायचयं? तर वापरा या घरगुती खास टिप्स !

Next
ong>-Ravindra More
महिलांसारखा पुुरुषांकडे स्वत:कडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो. याचा परिणाम त्यांच्या स्मार्टनेसवर होतो. मात्र पुरुषांनी थोडा वेळ काढून काही सोपे उपाय वापरल्यास तेही स्मार्ट दिसू शकतील. आज आम्ही आपणास अशा काही खास टिप्स देत आहोत, ज्या फॉलो केल्यास आपण स्मार्ट दिसण्यास मदत होईल. 

धूम्रपानापासून अलिप्त राहा
आपल्या स्मार्टनेसवर सर्वात परिणामकारक ठरणारे धूम्रपान असून ते शरीराला घातकदेखील आहे. स्मोकिंग केल्याने प्रकृती तर खराब होतेच पण त्याचा वाईट परिणाम सगळ्यात आधी आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. सिगारेटच्या सेवनाने चेहऱ्यावर लवकर सुरकत्या पडण्यास सुरुवात होते, चेहरा हिरमुसल्यासारखा होतो, आणि ओठं पण काळे पडतात. जर स्मार्ट दिसायचे असेल तर मग धूम्रपानापासून अलिप्त राहणेच योग्य असेल. 

दातांची काळजी
दातांची जेवढी काळजी आपण घेऊ तेवढेच आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलते. यासाठी शरीर आणि चेहऱ्याबरोबरच दातांची काळजी घेणेदेखील महत्त्वाचे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र दात आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेला आणखी निखळ बनवतात.

केसाची निगा
सध्या मुलांमध्ये नवनवीन हेअर स्टाइलची क्रेझ आहे. केसांच्या ठेवणीवर आपले सौंदर्य ठरत असते. यासाठी केस नीट विंचरणं, वेळच्यावेळी ती कापणं, योग्य तो शँपू वापरणे या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. कारण आपल्या चेहऱ्याला नवीन लूक आणि स्मार्ट बनवतं.

चेहऱ्याची काळजी
उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम येतो आणि धूळ बसते, म्हणून चेहºयाला दिवसातून 2-3 वेळा धूवा. असं केल्याने चेहऱ्यावर वयस्करपणा न दिसता चेहरा खुलून येतो.

रोज शेविंग नकोच
आपला चेहरा चांगला दिसावा, आपण तरुण दिसावं यासाठी बरेचजण रोज दाढी करतात. पण त्याने तरुणं दिसणं तर लांबच पण चेहरा खडबडीत होत, त्वचेत रफनेस येतो. त्यामुळे रोज दाढी करणं टाळा. 

Web Title: Beauty Tips: Men, Smart Art? Use the home special tips!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.