BEAUTY TIPS : ​सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 09:14 AM2017-03-24T09:14:18+5:302017-03-24T14:44:18+5:30

अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया की, ते कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले सौंदर्य अजूनच खुलेल.

BEAUTY TIPS: Mix 'O' foods in bath water for beauty! | BEAUTY TIPS : ​सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा !

BEAUTY TIPS : ​सौंदर्य खुलविण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिसळा !

Next
ong>-Ravindra More
अंघोळ केल्याने शारीरिक स्वच्छतेबरोबरच सकारात्मक रूपाने आराम मिळून ताणही कमी होतो. एका संशोधनानुसार अंघोळीच्या पाण्यात काही पदार्थ मिसळल्यास नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होते. जाणून घेऊया की, ते कोणते पदार्थ आहेत की ज्यामुळे आपले सौंदर्य अजूनच खुलेल. 

वाइन
वाइनमुळे त्वचेला पुनर्जीवन मिळत असल्याने सौंदर्यांसाठी अत्यंत लाभदायक आहे. अंघोळीच्या पाण्यात फक्त ५ ते ६ चमच वाइन मिक्स करून अंघोळ केल्याने त्वचा नरम आणि ताजीतवानी राहते. वाइनमधील अ‍ॅटीआॅक्सीडेंट्समुळे वेळेपूर्वी येणाºया सुरकुत्या रोखण्यात मदत होते.
 
ग्रीन टी
अंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी मिसळल्याने यात असणाऱ्या अ‍ॅटीआॅक्सींडे्टसमुळे त्वचा स्वच्छ राहते. शिवाय त्वचा व केसांनाही फायदा मिळतो. ग्रीन टीमध्ये केस बुडवून ठेवल्याने केस लांब आणि मजबूत होतात. ग्रीन टी नसल्यास आपण पेपरमिंट, लेमन टी किंवा इतर हर्बल टी मिसळू शकता.

मध
अंघोळीच्या पाण्यात मध मिसळळ्याने त्वचा मुलायम राहते. रुक्ष, वाळलेली आणि संवेदनशील त्वचेसाठी हे लाभदायक आहे. मधामध्ये अ‍ॅटीव्हायरल आणि अ‍ॅटीबॅक्टिरिअल गुण आढळतात ज्याने त्वचेला लाभ मिळतो. शिवाय कोमट पाण्यात १०-१२ चमचे मध मिसळून या पाण्यात काही वेळ बसून राहील्यानेहंी खूप फायदा मिळतो. 
 
दूध
दुधात आढळणारे व्हिटॅमिन्स आणि प्रोटिन्स त्वचेला चमकदार आणि हाइड्रेटेट ठेवतात. दूध शरीर आणि त्वचेसाठी लाभदायक असतं. कोमट पाण्यात एक दूध मिसळा आणि त्यात १५ ते २० मिनिट आराम करा.
 
ओट्स
पाण्यात काही ओट्स मिसळा आणि त्यात आराम करा. खाज सुटणे, रुक्ष त्वचा, संवेदनशील त्वचा यावर ओटमील बाथ लाभदायक ठरेल. ओटमील बाथ त्वचेला खोल पर्यंत स्वच्छ करतं.

बाथ सॉल्ट
डेड स्कीन काढण्यासाठी बाथ सॉल्ट उपयोगी ठरतं. म्हणून अंघोळीच्या पाण्यात २ ते ३ चमचे बाथ सॉल्ट मिसळून त्यात आराम करावा. बाथ सॉल्ट त्वचा स्वच्छ करण्यात मदत करतं. याने त्वचेवरील जमलेली धूळ आणि घाण स्वच्छ होते.
 
हर्ब्स
पाण्यात हर्ब्स मिळळ्याने त्वचा मुलायम होते. आपल्या ब्लड सर्कुलेशनला उत्तेजित करणारे हर्ब्स वापरायला हवे. हर्ब्सला त्वचा आणि शरीराला आराम मिळतो.
 
नाराळाचे तेल
अंघोळीच्या पाण्यात नाराळाचे तेल मिसळल्याने त्वचेला आणि शरीराला लाभ मिळतं. याने जळजळ, सूज दूर होते. त्वचा खूप काळासाठी हायड्रेट राहते. याव्यतिरिक्त आपण आपल्या आवडीप्रमाणे तेल मिसळू शकता. आपल्याला आपल्या त्वचेप्रमाणे तेल निवडायला हवे.

Web Title: BEAUTY TIPS: Mix 'O' foods in bath water for beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.