Beauty Tips : आता सौंदर्यासाठी फक्त ‘५’ मिनिट...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 09:43 AM2017-09-15T09:43:41+5:302017-09-15T15:13:41+5:30

अगदी कमी वेळेत आणि नैसर्गिक उपायांनी आपण आपले सौंदर्य खुलवू शकता, जाणून घ्या ते उपाय !

Beauty Tips: Now '5 minutes' for beauty ...! | Beauty Tips : आता सौंदर्यासाठी फक्त ‘५’ मिनिट...!

Beauty Tips : आता सौंदर्यासाठी फक्त ‘५’ मिनिट...!

Next
णही अभिनेत्रींसारखे सुंदर दिसावे असे प्रत्येक तरुणीला वाटत असते. मात्र वेळेच्या अभावी आपण आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाही शिवाय प्रदूषणामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल, पिंपल्स, सुरकुत्या येतात आणि आपल्या सौंदर्यात बाधा येते. मग सौंदर्य खुलविण्यासाठी आपण महागड्या प्रसाधनांचा वापर करतो, मात्र फरक हा तात्पुरताच दिसतो. आम्ही आपणास काही टिप्स देत असून अगदी कमी वेळेत आणि नैसर्गिक उपायांनी आपण आपले सौंदर्य खुलवू शकता.   
* चेहऱ्यावर आणि गळ्यावर मध लावा आणि थोड्या वेळानंतर बोटांच्या साह्याने चेहऱ्याची मसाज करा. मध पूर्णत: कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करावा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे त्वचेची चमक तर वाढेलच शिवाय कोरडेपणा आणि जास्त तेलकटपणादेखील कमी होईल आणि सौंदर्य खुलण्यास मदत होईल.  

* आपला चेहरा फ्रेश दिसावा असे वाटत असेल तर होममेड पॅकचा वापर करु शकता. हा पॅक बनविण्यासाठी दोन चमचा मुलतानी मातीच्या पावडरमध्ये अर्धा चमचा चंदन पावडर, अर्धा चमच केयोलिन पावडर, अर्धा चमचा मिल्क पावडर एकत्र घेऊन त्यान गुलाबपाणी किंवा काकळीचा ज्यूस त्यात मिक्स करुन पेस्ट बनवा. जेव्हाही आपणास चेहरा फ्रेश दिसावा असे वाटेल तेव्हा हा पॅक पूर्ण चेहऱ्याला लावा आणि काही मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ करा.  

* चेहऱ्याची त्वचा नितळ, कोमल आणि चमकदार बनविण्यासाठी चॉकलेट पॅकचा वापर करु शकता. चॉकलेट पॅक बनविण्यासाठी ५ टेबलस्पून कोको पावडर, ५ टेबलस्पून मध, २ टेबलस्पून मक्याचे पीठ आणि २ टेबलस्पून बारीक केलेला अ‍ॅवोकॅडो घेऊन चांगल्या प्रकारे एकत्र करा. हा पॅक रोज कोरड्या त्वचेवर लावावा आणि अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुवावा.  

* अर्धी वाटी मसूर दाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ही दाळ मिक्सर मधूर वाटून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. कोरडी झाल्यानंतर थंड पाण्याने धुवा. या पेस्टला दोन दिवसापर्यंत फ्रिजमध्ये ठेऊ शकता.     

Also Read : ​Beauty Tips : ​अधिक तरूण दिसण्यासाठी या ‘६’ पदार्थांचे करा सेवन !
                   :​Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी 'ही' गोष्ट अति महत्वाची !

Web Title: Beauty Tips: Now '5 minutes' for beauty ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.