कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 01:46 PM2019-03-21T13:46:28+5:302019-03-21T13:47:10+5:30

आपल्या त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अशातच अनेकांची त्वचा कोरडी असते. त्यामुळे त्वचेच्या ड्रायनेसपासून सुटका करण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. परंतु ड्राय स्किनवर अनेक उपाय करूनही त्याचा कोरडेपणा काही कमी होत नाही.

Beauty Tips : Oils that makes skin moisturize and soft | कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर

कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'या' तेलांचा करा वापर

Next

आपल्या त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अशातच अनेकांची त्वचा कोरडी असते. त्यामुळे त्वचेच्या ड्रायनेसपासून सुटका करण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत असतात. परंतु ड्राय स्किनवर अनेक उपाय करूनही त्याचा कोरडेपणा काही कमी होत नाही. असातच अनेक महिला वैतागून बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्ट्समुळे काही वेळासाठी ही समस्या दूर होते. अनेकदा तर या प्रोडक्ट्समध्ये केमिकल्स वापरण्यात आल्यामुळे त्वचेच्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला काही नॅचरल टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ड्राय स्किनची समस्या दूर होण्यासोबतच इतर इन्फेक्शन्सपासूनही बचाव होण्यास मदत होइल... 

बदामाचं तेल 

बदामाचं तेल कोरड्या त्वचेची समस्या दूर करून त्वचा मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरते. हातावर थोडंस तेल घेऊन त्याने त्वचेवर मालिश करा. याचा दररोज वापर करणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. 

द्राक्षांच्या बीयांचं तेल 

द्राक्षांच्या बीयांच्या तेलामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-ई आढळून येतं. जे त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. हे तेल डोळ्यांच्या आजूबाजूला असलेली काळी वर्तुळं आणि स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी मदत करतं. तेलाचे काही थेंब हातांवर घेऊन मालिश करा. त्वेचेचा कोरडेपणा दूर होतो. 

मोहरीचं तेल 

मोहरीचं तेल त्वचा मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 2 चमचे मोहरीचं तेल कोमट गरम करा. थंड झाल्यानंतर आपल्या हातांवर काही थेंब त्याने त्वचेवर मालिश करा. 

ऑलिव्ह ऑइल 

जर तुमची त्वचा फार कोरडी होत असेल तर त्वचा मुलायम करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल उत्तम पर्याय ठरतो. ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट यांसारखी तत्व आढळून येतात. जी त्वचा मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतात. परंतु त्वचेला लावण्याआधी तेल गरम करू नका. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 

Web Title: Beauty Tips : Oils that makes skin moisturize and soft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.