काही दिवसांतच दूर करा कोपर आणि अंडरआर्म्सचा काळपटपणा; 'हे' उपाय करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 12:33 PM2019-09-29T12:33:48+5:302019-09-29T12:35:16+5:30
अनेकदा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा वॉक्सिंगमुळे हाताचे कोपरे आणि अंडरआर्म्सची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेच्या तुलनेत काळी दिसू लागते. अनेकदा अस्वच्छतेमुळे किंवा या भागात मृत पेशी साठल्याने हा भाग शरीराच्या त्वचेपेक्षा काळवंडलेला आणि निस्तेज दिसतो.
अनेकदा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळे किंवा वॉक्सिंगमुळे हाताचे कोपरे आणि अंडरआर्म्सची त्वचा चेहऱ्याच्या त्वचेच्या तुलनेत काळी दिसू लागते. अनेकदा अस्वच्छतेमुळे किंवा या भागात मृत पेशी साठल्याने हा भाग शरीराच्या त्वचेपेक्षा काळवंडलेला आणि निस्तेज दिसतो. एवढचं नाहीतर अनेकदा लोक चेहरा आणि शरीराच्या अवयवांच्या त्वचेची फार काळजी घेताना दिसतात. परंतु, अनेकदा हाताच्या कोपराकडे आणि अंडरआर्म्सकडे दुर्लक्षं केलं जातं. त्यामुळे कोपराजवळची त्वचा काळी पडते.
हाताचा कोपर आणि अंडरआर्म्स स्वच्छ आणि सुंदर असेल तर तुमचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. तुम्ही सोप्या उपायांनी देखील कोपरांचा काळपटपणा नाहीसा करू शकता. जाणून घेऊयात हाताच्या कोपराची काळवंडलेली त्वचा उजळवण्यासाठी काही घरगूती उपाय...
कोरफडीचा गर
कोरफडीच्या गराचा उपयोग तुम्ही मान, अंडरआर्म्सच्या त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी करू शकता. कोरफड त्वचा सॉफ्ट आणि हायड्रेट करते आणि काळपटपणा दूर करण्यासाठीही मदत करते.
असा करा वापर...
कोपर आणि अंडरआर्म्सचा काळपटपणा दूर करण्यासाठी कोरफडीचं एक पान घ्या. त्यातील गर अंडरआर्म आणि कोपरावर लावून मसाज करा. असं 5 ते 7 मिनिटांसाठी करा आणि त्यानंतर 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने धुवून टाका.
- तुम्ही बाजारात मिळणाऱ्या कोरफडीच्या गराचाही वापर करू शकता. त्यासाठी तु्म्ही 2 चमचे कोरफडीचा गर एका बाउलमध्ये घ्या आणि त्यामध्ये तेवढचं गरम पाणी एकत्र करा. तयार पेस्ट काळवंडलेल्या त्वचेवर लावून मसाज करा. त्यानंतर 20 मिनिटांसाठी असंचं ठेवा. काही दिवसांतच फरक दिसून येईल.
लिंबू आणि मध
दोन चमचे मधामध्ये अर्धं लिंबू आणि थोडलं गुलाबजल एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण 5 मिनिटांसाठी अंडरमार्म्स आणि कोपरांवर लावून मसाज करा. त्यानंतर 20 मिनिटांसाठी तसचं ठेवा आणि थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवून टाका.
ही पद्धतही ठरते खास...
घरातून बाहेर पडताना किंवा उन्हामध्ये जाताना कोपरावर सनस्क्रिन लावणं विसरू नका. त्याचबरोबर वॅक्स केल्यानंतर अंडरआर्म्स्वर पावडर लावू नका. पावडर लावल्याने पोर्स बंद होतात आणि त्वचाही काळी पडते. त्यामुळे पाण्याने स्वच्छ केल्यानंतर मॉयश्चरायझरचा वापर करा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)