Beauty Tips : ​नाकावरील चष्माच्या खुणा मिटविण्यासाठी खास उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2017 10:43 AM2017-06-02T10:43:10+5:302017-06-02T16:13:10+5:30

चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण चष्मा वापरतो, मात्र हाच चष्मा आपल्या सौंदर्याला बाधा ठरु शकतो.

Beauty Tips: Special Remedies To Remove Signs Of Nasal Glasses! | Beauty Tips : ​नाकावरील चष्माच्या खुणा मिटविण्यासाठी खास उपाय !

Beauty Tips : ​नाकावरील चष्माच्या खुणा मिटविण्यासाठी खास उपाय !

Next
हऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी आपण चष्मा वापरतो, मात्र हाच चष्मा आपल्या सौंदर्याला बाधा ठरु शकतो. नेहमी चष्मा लावल्याने नाकावर खुणा पडतात शिवाय काळे डागही पडतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. आज आम्ही आपणास हे डाग कसे कमी करायचे याविषयी घरगुती काही खास टिप्स देत आहोत. 

* टोमॅटो 
टोमॅटोचा तुकडा प्रभावित भागावर लावा. काही मिनिटे तसेच लावून ठेवा. याशिवाय टोमॅटोच्या रसात काकडी व बटाट्याचा रस मिसळून या मिश्रणाने डाग असलेल्या भागावर मसाज करा. 

* अ‍ॅलोवेरा जेल 
अ‍ॅलोवेरा जेलमध्ये भरपूर अ‍ॅन्टि-आॅक्सिडेंट्स व विटॅमिन ए, ई, सी असल्याने त्वचेला आराम मिळतो. नाकावरील डाग मिटविण्यासाठी अ‍ॅलोवेरा जेल रात्री झोपण्यापूर्वी त्याजागी लावा. यामुळे काळे डाग निघून जाण्यास मदत होते.

* बटाटा 
बटाटा नैसर्गिक ब्लीच आहे. याचा उपयोग हायपरपिग्मेंटेशन मार्क्स कमी करण्यासाठी केला जातो. पातळ कापलेला बटाट्याचा तुकडा घेऊन प्रभावित भागावर २० मिनिटे लावून ठेवा. रोज असे केल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात. 

* लिंबू 
चष्म्यामुळे  पडलेल्या डागावर लिंबूचाही सकारात्मक फायदा होतो. यासाठी लिंबाचा रस काढून थोड्या पाण्यात मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर दररोज लावा. लिंबामुळे नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग उजळत असल्याने चेहऱ्यावर आलेले डाग निघून जातात. 

* काकडी 
काळी पडलेल्या त्वचेसाठी काकडी वपरा. यामुळे डाग कमी होतील. काकडी डोळ्यांसाठीदेखील चांगली आहे. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. काकडीचा रस चेहऱ्यावरील डागांना लावा. 


Web Title: Beauty Tips: Special Remedies To Remove Signs Of Nasal Glasses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.