Beauty Tips : अवघ्या दोन दिवसात ओठ होतील गुलाबी, ट्राय करा हे घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 08:30 AM2017-04-11T08:30:37+5:302017-04-11T14:00:37+5:30
आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. मात्र काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.
Next
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, विटॅमिन्सची कमतरता, वाढते वय, निर्जलीकरण आदी कारणांचा प्रभाव ओठांवर पडत असतो आणि ओठ काळे पडतात. मात्र आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता.
काय उपाय कराल?
१) एक चमच दूध आणि एक चमच मिल्क क्रिम घेऊन त्यात थोडे केसर मिक्स करा. हे मिश्रण थोड्या वेळासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ओठांवर लावा. त्यानंतर काही वेळानंतर कापसाने पुसा. यामुळे आपले ओठ गुलाबी होण्यास मदत होईल.
२) एक चमच दूध घेऊन त्यात लाल गुलाबाच्या काही पाक ळ्या टाका. ते दूध गुलाबी होई पर्यंत ढवळा. त्यानंतर दूधातील पाकळ्या बाहेर काढून ते दूध फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्याने दूधात एक चमच बदाम पावडर मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट ओठांवर लावा. १० ते १५ मिनिटानंतर कापसाने पुसा. याने ओठ गुलाबी होतील.
३) अर्धा चमच मध घेऊन त्यात अर्धा चमच लहान लिंबूचा रस मिक्स करा. हे मिश्रण ओठांवर लावल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत होईल.
४) टमाटरच्या पेस्ट मध्ये मिल्क क्रिम मिक्स करु न हे मिश्रण ओठांवर लावल्यानेही आपले ओठ गुलाबी होतील.