Beauty Tips : चेहरा सुंदर बनवण्यासाठी "बियर"चा असाही वापर !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 10:50 AM2017-05-16T10:50:14+5:302017-05-16T16:20:14+5:30
बियर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहरा सुंदर बनवण्यासाठी बियरचा वापर करू शकतो.
Next
बियर पिणे जरी आरोग्यासाठी हानिकारक असले तरी चेहरा सुंदर बनवण्यासाठी बियरचा वापर करू शकतो. बियरमुळे त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास मदत करतात. यातील यिस्ट मुरुमांची समस्या दूर करतात. बियर त्वचेवर लावल्यास इन्फेक्शन तसेच इतर समस्याही दूर होतात.
* २ चमचे बियरमध्ये अर्धा चमचा दही, ऑलिव्ह ऑईल आणि बदामाची पेस्ट मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा मुलायम होईल तसेच ग्लो वाढेल.
* थोड्याशा बियरमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील ब्लॅक आणि व्हाईटहेड दूर होतात. त्याचप्रमाणे रंगही उजळतो.
* एक चमचा टोमॅटोचा रस आणि बियर एकत्रित करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा. ५ मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावरील डाग निघून जातील.
* अर्धा चमचा बियर आणि एका अंड्याचा सफेद भाग मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. यामुळेही त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होईल.
* एक चमचा बियर, दही, मध आणि लिंबाचा रस एकत्रित करा. ही पेस्ट कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही.