Beauty Tips : शेव्हिंगनंतर मुलायम चेहरा हवाय? वापरा हे घरगुती फेस मास्क !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2017 12:38 PM2017-04-08T12:38:28+5:302017-04-08T18:08:28+5:30
पुुरुष तरुण आणि स्मार्ट दिसण्यासाठी सतत शेव्हिंग करतात, मात्र यामुळे त्वचा कोरडी होते मात्र हे फेस मास्क चेहऱ्यावर लावल्यास तुमचा चेहरा साफ व चमकदार दिसेल.
Next
पुुरुष तरुण आणि स्मार्ट दिसण्यासाठी सतत शेव्हिंग करतात, मात्र यामुळे त्वचा कोरडी होऊन चेहऱ्यावर मुरुमांचे प्रमाणही वाढते. शिवाय शेव्हिंग करताना कट पडत असल्याने ते त्रासदायकही ठरतात. यासर्वांचा परिणाम चेहऱ्याच्या सौंदर्यावर होतो. या सर्व समस्या दूर करण्यासाठी काही फेसपॅक असून ते चेहऱ्यावर लावल्यास तुमचा चेहरा साफ व चमकदार दिसेल.
* काकडीचा फेसपॅक
शेव्हिंग करताना चेहऱ्याचा ओलावा कमी होतो. यामुळे चेहरा ड्राय होतो. अशावेळी काकडी चेहऱ्यातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करते. काकडीचा फेस पॅक आपल्या त्वचेतील कोरडेपणा दूर करतो. यासाठी १ चमचा किसलेल्या काकडीत ओटमील व दही मिसळून चेहºयावर लावा. अर्ध्या तासाने पॅक वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या.
* केळीचा मास्क
केळीमध्ये उपलब्ध पोषण तत्वामुळे केळ्याचा मास्क त्वचेसाठी लाभदायक आहे. शेव्हिंगनंतर त्वचेला ओलावा देण्यासाठी हा मास्क वापरा. केळ्याचा मास्क वापरण्यासाठी दही व मध एकत्र मिसळून त्यात केळी कुस्करून घ्या. हे मिश्रण १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यामुळे तुमची त्वचा टवटवीत होईल.
* मधाचा मास्क
नुसते मध हा एक उत्तम फेस पॅक आहे. हे एक नैसर्गिक मॉईश्चरायझर आहे. याचा उपयोग तुम्ही शेव्हिंगनंतर सहज करू शकता. त्वचा कोमल व आर्द्र बनवण्यासाठी चेहऱ्यावर मधाचा मास्क लावा.