Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी केळीचा असाही वापर !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 07:10 AM2017-08-23T07:10:08+5:302018-06-23T12:04:01+5:30

केळीचा उपयोग फक्त अ‍ॅनर्जी वाढविण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य खुलविण्यासाठीही केला जातो. चला जाणून घेऊया केळीच्या इतर फायद्यांविषयी...

Beauty: Use of banana to open beauty! | Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी केळीचा असाही वापर !

Beauty : ​सौंदर्य खुलविण्यासाठी केळीचा असाही वापर !

googlenewsNext
्स्टंट अ‍ॅनर्जी बूस्टर म्हणून केळीला ओळखले जाते. शिवाय वर्कआऊट केल्यानंतर केळीचे सेवन खूपच फायदेशीर ठरते. मात्र केळीचा उपयोग फक्त अ‍ॅनर्जी वाढविण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य खुलविण्यासाठीही केला जातो. चला जाणून घेऊया केळीच्या इतर फायद्यांविषयी...
* आपले केस जर निर्जिव आणि कोरडे असतील तर केळीच्या साह्याने केसांना शायनी करू शकता. यासाठी दोन लहान केळींमध्ये एक चमचा आॅलिव्ह आॅइल आणि तीन मोठे चमचे मेयोनेज टाकून ब्लेंड करा. हे डोक्यावर आणि केसांवर चांगल्या प्रकारे लावा. अर्धा तासानंतर हे चांगल्या प्रकारे धुवून घ्या.

* दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठीही केळीचा उपयोग होतो असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासाठी केळीचे साल दोन मिनिट दातांवर घासा आणि त्यानंतर पाण्याने धुवा. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.  

* आपल्याला लहान-मोठा चटका लागल्यास त्यावर केळीची साल लावल्यास लगेच आराम मिळतो. मात्र जखम जास्त मोठी असेल तर याचा प्रयोग न करता तात्काळ डॉक्टरांकडे जावे.
 
* जर तुम्ही तुमच्या ड्राय स्किनने त्रस्त असाल तर बनाना फेस पॅकचा वापर करा. यासाठी गरजेप्रमाणे केळी मॅश करा आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे मध टाकून मिक्स करुन घ्या. आता हे पॅक १५ ते २० मिनिटे ठेवून पाण्याने धुवून घ्या.
 
* भेगा पडलेल्या टाचा नॅचरली चांगल्या करायच्या असतील तर केळी, मध आणि लिंबूचे पॅक बनवा. यासाठी पिकलेल्या केळीला मॅश करुन त्यामध्ये मध आणि लिंबूचा रस टाका. हे पॅक भेगा पडलेल्या टाचांवर एक तास लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून घ्या. दोन दिवसांतून एकदा याचा वापर करा. तुमची समस्या दूर होईल.

Also Read : ​Health : ​कच्चे केळ खाण्याचे फायदे जाणून व्हाल थक्क !
                  : ​​लाल केळी आरोग्यासाठी फायदेशीर !

Web Title: Beauty: Use of banana to open beauty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.