Beauty : पुरुषांच्या सौंदर्यासाठी रोज एक अंडे पुरेसे, असे वापरा !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2017 09:14 AM2017-06-07T09:14:57+5:302017-06-07T14:44:57+5:30

सौंदर्य खुलविण्यासाठी अंड्याचा असा करा वापर

Beauty: Use one egg everyday for men's beauty, use it! | Beauty : पुरुषांच्या सौंदर्यासाठी रोज एक अंडे पुरेसे, असे वापरा !

Beauty : पुरुषांच्या सौंदर्यासाठी रोज एक अंडे पुरेसे, असे वापरा !

Next
महिलांसारखेच पुरुषांनाही आपण सुंदर दिसावे असे वाटू लागले आहे. त्यासाठी पुरुषांकडून अनेक पर्यायही केले जातात. मात्र अपेक्षित परिणाम दिसत नसल्याने पुरुष आपल्या सौंदर्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. 
काही ब्यूटी एक्सपर्टनी मुलांचे सौंदर्य वाढविण्यासाठी अंडे वापरण्याचा सल्ला दिला आहे. अंड्यातील न्यूट्रिएंट्समुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते शिवाय अन्य समस्याही दूर होऊन त्वचेचा रंग सुधारण्यासही मदत होते. 
अंड्यातील पांढऱ्या भागाला एल्ब्यूमिन म्हणतात. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नीशियमचे प्रमाण अधिक असते. 
अंड्यातील पिवळ्या भागात विटॅमिन ए, विटामिन सी, विटॅमिन डी असते. सोबतच कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम असते. 
अंड्याच्या टरफल्यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे स्किन टिश्यूजचे नुकसान होण्यापासून बचाव होतो. 

* सौंदर्य खुलविण्यासाठी अंड्याचा असा करा वापर 
* अंड्याच्या पांढऱ्या भागात आॅरेंज ज्यूस आणि हळद एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास रंग सुधारण्यास मदत होते. 
* अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावल्यास स्किन ग्लो होण्यास मदत होते.
* अंड्याच्या पांढऱ्या भागात मध आणि लिंबूचा रस एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास डाग दूर होण्यास मदत होते. 
* अंड्याच्या पांढऱ्या भागात ओटचे पिठ एकत्र करुन लावल्यास तेलकट त्वचेपासून मुक्तता मिळेल. 
* अंड्याचा पिवळा भाग चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होतात. 
* अंड्याच्या पिवळ्या भागात दही मिक्स करून लावल्यास त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
* अंड्याची टरफ लेंचा बारीक चुरा करुन त्यात दही मिक्स करुन लावल्यास चेहरावरील काळपटपणा दूर होतो. 
* अंड्याच्या टरफलांपासून बनविलेल्या पावडरमध्ये बेसन आणि लिंबूचा रस मिक्स करुन चेहऱ्यावर लावल्यास टॅनिंग दूर होते. 

Web Title: Beauty: Use one egg everyday for men's beauty, use it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.