​Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 11:49 AM2017-05-23T11:49:06+5:302017-05-23T17:19:06+5:30

त्याच्या सौंदर्याचे कारण म्हणजे इराणची भौगोलिक आणि जेनेटिक कंडीशन्स तर आहेच मात्र त्याचे श्रेय काही खाद्यपदार्थ आणि घरगुती उपायांदेखील जाते.

Beauty: Why are so beautiful women in Iran, know their beauty secret! | ​Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य !

​Beauty : का एवढ्या सुंदर असतात ‘इराण’च्या महिला, जाणून घ्या त्यांचे सौंदर्याचे रहस्य !

Next
ong>-Ravindra More
डेली मिररने केलेल्या केलेल्या सर्वेनुसार इराणच्या महिलांना सर्वात सुंदर मानण्यात आले आहे. त्याच्या सौंदर्याचे कारण म्हणजे इराणची भौगोलिक आणि जेनेटिक कंडीशन्स तर आहेच मात्र त्याचे श्रेय काही खाद्यपदार्थ आणि घरगुती उपायांदेखील जाते. येथील महिला नियमित आपल्या आहारात नेहमी असे पदार्थ घेतात ज्यामुळे त्यांची त्वचा ग्लोइंग आणि केस सुंदर राहतात. 
जाणून घेऊया त्यांच्या आहारात काय समावेश असते...

* गुलाब पाणी
या महिला नेहमी गुलाब पाण्याचा वापर करतात. यात विटॅमिन ई असते, ज्यामुळे स्किन सॉफ्ट होते शिवाय चकाकीदेखील येते. 

* दही
या महिला नाश्त्यात नेहमी दहीचे सेवन करतात. त्यातील फायबरमुळे वजन नियंत्रणात राहते. शिवाय दहीमुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुदृढ राहते. 

* मध 
येथील महिला रोज मधाचे सेवन करतात. मधामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल प्रॉपर्टिज असते. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतात आणि केसांमधील कोंडा नाहिसा होतो. 

* अक्रोड
त्या नेहमी अक्रोडचे सेवन करतात. अक्रोडमध्ये कॅलरीज कमी असल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय यातील विटॅमिन ई मुळे स्किन ग्लो होण्यास मदत होते. 

* मध आणि लिंबूचा रस
त्या मधात लिंबूचा रस आणि साखर एकत्र करुन बॉडी स्क्रब करतात ज्यामुळे त्वचेचा रंग उजाळण्यास मदत होते. 

* तांदुळ
इराणी महिला तांदुळ जास्त सेवन करतात. याच्या सेवनाने शरीरात ओलावा टिकून राहतो ज्यामुळे स्किन मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. 

* मासे
या महिला मास्यांचे जास्त सेवन करतात. यातील ओमेगा३ फॅटी अ‍ॅसिडमुळे सौंदर्य खुलण्यास मदत होते. 

* बदाम तेल
या महिला नारळ तेल आणि बदाम तेलाने शरीराची मालिश करतात ज्यामुळे स्किनचा ग्लो वाढण्यास मदत होते. 

* कोरफड ज्यूस
त्या कोरफड ज्यूसला चेहऱ्यावर लावतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग नाहिसे होतात. 

* मीठाचे पाणी
त्या मीठाच्या पाण्याने स्रान करतात, ज्यामुळे डेड स्किन निघून जाते आणि रंग उजाळण्यास मदत होते. 

Also Read : ​BEAUTY TIPS : सतेज त्वचेसाठी करा घरगुती उपाय !

Web Title: Beauty: Why are so beautiful women in Iran, know their beauty secret!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.