चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा 'हे' 4 फ्रुट फेशिअल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:11 PM2019-08-15T14:11:44+5:302019-08-15T14:18:48+5:30
चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी आपण अनेक ब्युटी प्रोडक्ट्स वापरत असतो. तसेच पार्लरमधील अनेक ब्युटी ट्रिटमेंट्सचाही आधार घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का? फळांच्या मदतीने सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवणं सहज शक्य होतं.
चेहऱ्याची त्वचा उजळवण्यासाठी आपण अनेक ब्युटी प्रोडक्ट्स वापरत असतो. तसेच पार्लरमधील अनेक ब्युटी ट्रिटमेंट्सचाही आधार घेतो. पण तुम्हाला माहीत आहे का? फळांच्या मदतीने सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवणं सहज शक्य होतं. परंतु, यासाठी फळं फक्त खाणंच नाही तर चेहऱ्यावर लावण्याची गरज आहे. फ्रुट फेशिअलचा वापर करून चेहरा उजळवणं सहज शक्य होतं.
जाणून घेऊया फ्रुट फेशिअलच्या फायद्यांबाबत...
फ्रुट फेशिअलमध्ये कोणत्याही प्रकारच्या आर्टिफिशिअल पदार्थ वापरण्यात आलेले नसतात. ज्यामुळे हे त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. फळांमध्ये असलेली पोषक तत्व म्हणजेच, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात चेहऱ्याला मिळतात.
काकडीचा फेशिअल
जर त्वचेवर सुरकुत्या आणि खाजेची समस्या होत असेल तर अशातच तुम्ही काकडीचं फेशिअल करू शकता. त्यामुळे स्किनचे डीप पोर्स टाइट होतात आणि ओपन पोर्सची समस्या दूर होते. काकडी फेशिअल चेहऱ्यावर यंग लूक मिळवण्यासाठी मदत करते.
सफरचंदाचं फेशिअल
चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी सफरचंदाचं फेशिअल अत्यंत फायदेशीर ठरतं. सफरचंदामध्ये असलेली अनेक पोषक तत्व स्किन टोन लाइट करतात आणि उजाळाही वाढवतात. सफरचंदाचा फेस पॅक सूर्याच्या घातक किरणांपासून त्वचेचं रक्षण करतो आणि एजिंग इफेक्ट्सही कमी करतो.
केळीचं फेशिअल
केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असतं. ज्यामुळे हे स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. ड्राय स्किनसाठी केळी रामबाण उपा ठरतात. याव्यतिरिक्त सफरचंद आणि द्राक्षांचा पॅकही ड्राय स्किनसाठी उत्तम ठरतात.
स्ट्रॉबेरी फेशिअल
स्ट्रॉबेरी फेशिअलही स्किन टोन लाइट करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी-ऑक्सिडंट स्किनवरील फ्री-रॅडिकल्स आणि इतर घाण काढून टाकण्यासाठी मदत करून फ्रेश लूक देते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.