त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी मोसंबीच्या रसाचा असा होतो फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 03:23 PM2018-09-26T15:23:00+5:302018-09-26T15:28:09+5:30
मोसंबी आणि संत्री या दोन्ही फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ही फळे खायलाही चविष्ट असतात आणि याने आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.
मोसंबी आणि संत्री या दोन्ही फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ही फळे खायलाही चविष्ट असतात आणि याने आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. उन्हाळ्या मोठ्या आवडीने लोक मोसंबी खातात आणि त्याचा ज्यूसही पितात. मोसंबीमुळे पचनक्रिया आणखी चांगली होते. तसेच वजन कमी करण्यासाठाही मोसंबी मदत करतं. आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच मोसंबीमुळे त्वचा आणि केसांनाही अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ मोसंबीचे त्वचेला होणारे फायदे...
१) पिगमेंटेशन, स्पॉट्स, ब्लेमिशेस
या तीन समस्या त्वचेवर होणाऱ्या समस्यांमध्ये सर्वात कॉमन समस्या आहेत. वाढत्या वयासोबत या समस्या प्रत्येक दुसऱ्या महिलांना होतात. यापासून बचाव करायचा असेल तर स्पॉट्स किंवा खराब झालेल्या त्वचेवर रात्री झोपताना मोसंबीचा रस लावा आणि सकाळी उठून कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
२) स्कीन इन्फेक्शन
मोसंबीमध्ये अॅंटीऑक्सीडेंट, अॅंटी-बायोटीक आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स-मिनरल्स असतात. त्यामुळे यात वेगवेगळ्या प्रकारचे स्कीन इन्फेक्शन दूर करण्याची क्षमता असते. मोसंबी केवळ चेहऱ्यावर लावल्यानेही फायदे होतात. तसेच ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध होतं.
३) घामाची दुर्गंधी
ज्या लोकांच्या घामाची अधिक दुर्गंधी येते किंवा आंघोळ केल्यावरही शरीर फ्रेश वाटत नसेल तर त्यांनी आंघोळीच्या पाण्यात मोसंबीचा थोडा रस टाकावा. मोसंबीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन-सी मुळे नैसर्गिक प्रकारे घामाची दुर्गंधी दूर होते.
४) फाटलेले ओठ
दिवसातून २ ते ३ वेळा मोसंबीचा रस ओठांवर लावा ओठ ठिक होतील. ओठांना व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळतात त्यामुळे ते मुलायम होतात.
५) सूज, वेदना
जर त्वचेवर आतून सूज किंवा वेदना होत असेल तर मोसंबीचा रस फायदेशीर ठरु शकतो. सूज झालेल्या किंवा वेदना होत असलेल्या भागावर याचा रस लावावा. दिवसातून ३ ते ४ वेळा असे केल्याने त्रास कमी होईल.
मोसंबीने केसांना होणारे फायदे-
१) यात कॉपर आहे
मोसंबीमध्ये कॉपर नावाचं मिनरल असतात जे केसांना नैसर्गिक रंग देण्यास मदत करतात. याच्या वापराने केसांची रंगत कमी होत नाही.
२) मोसंबीच्या रसाने केस धुण्याचे फायदे
शॅम्पू आणि कंडीशनर केल्यानंतर जर केसांना मोसंबीचा रस मिश्रित केलेल्या पाण्याने धुतल्यास शॅम्पू आणि कंडीशनरचं राहिलेलं केमिकलही निघून जातं. तसेच केसांना चांगला सुंगधही येतो.