चेहऱ्यावर तांदळाचं पाणी लावल्याने काय होतं? जाणून घ्या कसं लावाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:49 PM2024-09-23T12:49:49+5:302024-09-23T12:56:08+5:30
Rice Water Benefits : जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्कीन हवी असेल तर तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याचे फायदे...
Rice Water Benefits : भारतीय घरांमध्ये भात जवळपास रोजच खाल्ला जातो. भाताशिवाय तर अनेकांचं जेवणच पूर्ण होत नाही. तांदळापासून वेगवेगळ्या डिश तयार केल्या जातात. भात खाण्याचे आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. महत्वाची बाब म्हणजे अनेकांना हे माहीत नसतं की, तांदळाचे त्वचेलाही अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्कीन हवी असेल तर तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता. चला जाणून घेऊ तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याचे फायदे...
तांदळाच्या पाण्याचे फायदे
१) ग्लोईंग स्कीन
तांदळाच्या पाण्याने त्वचा चमकदार आणि हेल्दी बनवण्यास मदत मिळते. कारण यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई असतं.
२) पिंपल्स होतील दूर
तांदळाच्या पाण्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पिंपल्स व त्वचेची जळजळ दूर करण्यास मदत करतात.
३) टोनर
तांदळाचं पाणी त्वचेचा रंग समान आणि हलका करण्यास मदत करतात. याने काळे डाग आणि टॅनिंग दूर होते.
४) हायड्रेट
तांदळाचं पाणी त्वचेला मॉइश्चराइज करतं, ज्यामुळे त्वचा मुलायम बनते. जर तुम्ही त्वचा नेहमीच ड्राय राहत असेल तर तुम्ही तांदळाच्या पाण्याचा वापर करू शकता.
५) सुरकुत्या
तांदळाच्या पाण्यात असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंटने वय वाढण्याचे संकेत जसे की, सुरकुत्या आणि फाइन लाईन्स कमी करण्यास मदत मिळते.
६) सनस्क्रीन
तांदळाच्या पाण्यात सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करणारे तत्व असतात. ज्यामुळे त्वचेचं नुकसान टाळला येतं.
कसा कराल याचा वापर?
तांदळाचं पाणी त्वचेवर लावण्याची आणि ते तयार करण्याची पद्धत आधी जाणून घ्या. तांदळाचं पाणी तयार करण्यासाठी २ कप पाण्यात एक कप तांदूळ भिजवा. अर्ध्या तासांनंतर तुम्हाला तांदूळ खाली बसलेले दिसतील. हे पाणी एका बॉटलमध्ये भरा. चेहऱ्यावर लावण्यासाठी तांदळाचं पाणी तयार आहे.
तांदळाचं हे पाणी तुम्ही चेहऱ्यावर थेट लावू शकता. रूईच्या मदतीने तुम्ही हे पाणी चेहऱ्यावर लावावं. त्याशिवाय तांदळाचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून चेहऱ्यावर स्प्रे सुद्धा करू शकता.